

Maharashtra SIT searching for Kalpana Kharat: महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचार व फसवणूक असे तब्बल अकरा गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.
दरम्यान शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून पोलिस व एसआयटी पथक तीच्या मागावर आहे.
कल्पना खरातची माहिती काढण्यासाठी एसआयटीच्या पथकाने मंगळवारी (दि. ३१) रात्री तीचा मुलगा हर्षवर्धन खरात यास नाशिक येथील घरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दरम्यान, एसआयटीच्या पथकाने खरातच्या संपूर्ण बंगल्यात पाहणी केली मात्र संशयित कल्पना खरात मिळून आली नाही. बंगल्यात हर्षवर्धन पोलिसांच्या हाती लागला; परंतु चौकशीनंतर मध्यरात्री त्याला सोडून देण्यात आले.
शिर्डी पोलिसांत फसवणुकीच्या गुन्ह्यात कल्पना खरातचा समावेश असल्याने तिला अटक करण्यासाठी पोलिस तीच्या शोधात आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून तपास यंत्रणांना तिचा शोध लागलेला नाही. कल्पना खरातचा मोबाईल 'नॉट रिचेबल' असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
शिर्डीतील चार एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात खरातच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी याप्रकरणी शिर्डी पोलिसांत फिर्याद दिली होती.
कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून जमीन बळकावल्याचा आरोप खरातसह त्याच्या पत्नीवर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात तसेच शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल होताच खरातची पत्नी फरार झाली. दरम्यान खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना SIT कडून अशोक खरातची चौकशी सुरू होती, तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांवर पाळत का ठेवली गेली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
तपास यंत्रणांना गुंगारा देत कल्पना खरात कोठे गायब झाल्या? कशा झाल्या असे अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. दरम्यान या प्रकरणातील अरविंद बावके आणि किरण सोनावणे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांकडून इतर आरोपींचाही शोध सुरु आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.