Kalpana Kharat Case | Ashok Kharat Fraud | Sinnar Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : कल्पना खरात कुठे आहे? 20 वा गुन्हा दाखल, खरातच्या आर्थिक साम्राज्याचा उलगडा करताना पोलिसांची दमछाक

Ashok Kharat Fraud Sinnar Scam : अहिल्यानगर, सिन्नर पोलीस आणि शासनाच्या एसआयटीने भोंदू खरात याला 9 आठवडे कोठडीत ठेवले. त्याच्या विरोधात आतापर्यंत वीस गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय सिन्नर आणि कोपरगाव येथे पतसंस्थेतील बेनामी व्यवहारांचा ईडी कडून तपास करण्यात आला.

Sampat Devgire

Nashik News, 31 May : भोंदू अशोक खरात यांच्या विरोधात विसावा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे कोठडी संपलेल्या वादग्रस्त खरातला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतली. त्याची कोठडी रवानगी झाली आहे.

कुंदेवाडी (सिन्नर) येथील जगदंबामाता पतसंस्थेतील 32 बनावट खाते उघडण्यात आले होते. त्यात 52 कोटी रुपयांचा बेनामी व्यवहार झाला. या पैशांचा वापर जमीन खरेदी करण्यासाठी झाला. त्यातील जमीन खरेदीत फसवणुकीचा नवा गुन्हा सिन्नर पोलिसांनी दाखल केला.

या संदर्भात 2004 मध्ये जगदंबा पतसंस्थेतील बेनामी व्यवहारांच्या माध्यमातून जमीन खरेदी झाली. जमीन खरेदी खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावे करण्यात आली. त्यात फसवणूक झाल्याची तक्रार जमीन मालकाने केली आहे.

याच प्रकरणात सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे आणि पतसंस्थेचे अध्यक्ष नामकर्ण आवारे यांना आधीच अटक झाली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. फसवणूक प्रकरणात या दोघांचाही थेट संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

अहिल्यानगर, सिन्नर पोलीस आणि शासनाच्या एसआयटीने भोंदू कॅप्टन खरात याला 9 आठवडे कोठडीत ठेवले. त्याच्या विरोधात आतापर्यंत वीस गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय सिन्नर आणि कोपरगाव येथे पतसंस्थेतील बेनामी व्यवहारांचा ईडी कडून तपास करण्यात आला.

या सर्व प्रकरणातील बेनामी रक्कम आणि फसवणुकीतून जमा केलेल्या पैशांची मालमत्ता पत्नी कल्पना खरात हिच्या नावे खरेदी करण्यात आली आहे. कल्पना खरात हिला अद्याप अटकपूर्व जामीन मंजूर झालेला नाही. मात्र सर्व तपासांमध्ये जिच्या नावे बेनामी जमिनी खरेदी झाल्या ती महिला अद्याप पोलिसांच्या दृष्टीने बेपत्ता आहे. पोलिसांनी न्यायालयात कोठडीचा अर्ज करताना कल्पना खरात यांच्या नावे खरेदी केलेल्या जमिनीचा तपास हे प्रमुख कारण आजवर दिले आहे.

नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि पुणे येथे श्रीमती खरात हिच्या नावे जमिनी तसेच व्यवसायिक मालमत्ता खरेदी करण्यात आली आहे. मात्र विविध यंत्रणांनी तपास करूनही अद्याप या प्रकरणात खरात वगळता अन्य कोणीही राजकीय नेते तसेच पत्नी खरात हिला देखील अद्याप अटक होऊ शकलेली नाही. त्यामुळे हा सबंध तपास पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT