Nashik Politics : नाशिक महापालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रंमाक पाच मधून निवडून आलेले नगरसेवक कमलेश बोडके यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर सलग दुसरा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महापालिका निवडणूक काळात प्रचारा दरम्यान जानेवारी महिन्यात मतदानाच्या आदल्या दिवशी (१४ जानेवारी) कमलेश बोडके यांच्याविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. 'विरोधात प्रचार करतो' या कारणावरून अपहरण व मारहाणीचा प्रकार घडला होता. तेव्हा बांधकाम व्यावसायिक मनोज भगीरथ मुंडावरे यांनी बोडकेंसह त्यांच्या साथीदारांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. कमलेश बोडके यांनी धमकी दिली. तसेच त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत केला होता.
संशयित कमलेश बोडके व त्यांचे साथीदार नितीन शेळके, नीलेश घुगे, मयूर बोडके, ऋषभ दिघे व इतर संशयितांनी पेठरोड येथील कुमावतनगर येथे 'तू माझ्याविरोधात प्रचार करतोस का, तुला सहा महिने फिरू देणार नाही,' असे धमकावत घराबाहेर ओढून कारमध्ये बसवून अपहरण करत मारहाण केली असे मुंडावरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते. यानंतर कमलेश बोडके निवडणुकीत विजय झाले होते. बोडके यांनी त्यावेळी आपल्याविरोधात जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचल्याचं तेव्हा म्हटलं होतं.
आता मतदान व निकालानंतर पुन्हा त्यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीदरम्यानच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमाव करून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बोडके यांच्याविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक बोडके, ऋषभ दिघे, नीलेश घुगे, गोकुळ बोडके यांच्यासह आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अरुण काशीनाथ धात्रक (वय ५१, रा. नळवाडी, ता. दिंडोरी) यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धात्रक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘तू निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये कशासाठी आला होता’ असा जाब विचारत. धात्रक यांना संशयित बोडके यांनी बेदम मारहाण केली. त्यावेळी बोडके यांच्याबरोबर असलेले ऋषभ दिघे, नीलेश घुगे, गोकुळ बोडके व दोन साथीदारांनीही मारहाण केली. तसेच ‘तू नाशिकमध्ये दिस, की तुझा गेमच करतो’ अशी धमकी दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
मला अडकविण्याचे षडयंत्र : बोडके
मतदानापूर्वी जानेवारी महिन्यात आणि आता निकाल लागल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात बोडकेंसह साथीदारांवर दुसरा गुन्हा दाखल झाल्याने बोडकेंच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान हे मला अडकविण्याचे राजकीय षडयंत्र आहे. राजकीय आकसातून खोटा व बनावट गुन्हा दाखल केला. याची निष्पक्ष व सखोल चौकशी झाली पाहिजे असं नगरसेवक कमलेश बोडके यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.