Malegaon Mayor Election : महापौरपदाच्या हट्टाने दादा भुसेंचं गणित फसलं, मालेगावात महापौर-उपमहापौर दोन्ही पदे गमावली

Dada Bhuse’s Strategy Backfires In Malegaon Mayor Election : मालेगाव महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसविण्याचे मंत्री दादा भुसे यांचे स्वप्न स्वप्नच राहिले. इस्लाम पार्टीच्या नसरीन बानो मोहम्मद खालिद महापौर झाल्या.
Malegaon Mayor Election, Nasreen Shaikh Mohammad Khalid, Dada Bhuse
Malegaon Mayor Nasreen Shaikh Mohammad Khalid, Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics : मालेगाव महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसविण्याचे मंत्री दादा भुसे यांचे स्वप्न भंगले आहे. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदावर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नसरीन शेख यांनी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार लता घोडके यांना पराभूत केलं.

महापौरपदासाठी झालेल्या थेट लढतीत काँग्रेस व समाजवादी पार्टीने इस्लाम पार्टीला मतदान केले. इस्लाम पार्टीची ३५ समाजवादी पार्टीचे ५ व कॉंग्रेसची ३ अशी एकुण ४३ मते नसरीन बानो मोहम्मद खालिद शेख यांना मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना फक्त १८ मतांवर समाधान मानावे लागले. शेख नसरीन बानो यांनी 25 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

तर उपमहापौर पदी समाजवादी पार्टीच्या शानेहिंद निहाल अहमद विजयी झाल्या. त्यांना ४३ मते मिळाली. शिवसेनेचे निलेश काकडे यांना केवळ १८ मते मिळाली. भाजप व एमआयएम तटस्थ राहिले. दिवंगत नेते निहाल अहमद यांच्या वारसदाराला तब्बल २० वर्षानंतर महत्वाचे पद मिळाले. इस्लाम पक्ष व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला.

Malegaon Mayor Election, Nasreen Shaikh Mohammad Khalid, Dada Bhuse
Girish Mahajan : CM फडणवीसांच्या सलग दुसऱ्या परीक्षेत गिरीश महाजन पहिल्या नंबरने पास; आता तरी पालकमंत्रीपद मिळणार का?

मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 आणि एमआयएमचे 21 नगरसेवक निवडून आलेले आहेत. परंतु भाजप आणि एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने इस्लाम पार्टीला त्याचा फायदा झाला.

राजकीय जाणकारांच्या मते, मालेगावात शिवसेनेला उपमहापौरपद सहज मिळवता आले असते. जर इस्लामचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर असे गणित जुळवले असते. मात्र मंत्री दादा भुसे यांनी केवळ १८ नगरसेवकांच्या जोरावर महापौरपदाची स्वप्न बघितली. मात्र त्यांच्या याच हट्टापायी सहज मिळू शकलं असतं असं उपमहापौरपदही शिवसेनेच्या हातातून निसटले. साहजिकच इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 अशा चाळीस जागा सेक्युलर फ्रंटकडे असल्याने महापौरपद ते कसे शिवसेनेला सोडतील? मात्र तरीही दादा भुसेंनी महापौरपदाची अपेक्षा ठेवल्याने दोन्ही पदे गमवावी लागली आहे.

Malegaon Mayor Election, Nasreen Shaikh Mohammad Khalid, Dada Bhuse
Nashik Deputy Mayor : नाशिकच्या उपमहापौरपदावरून शिंदे शिवसेनेत नाराजीचा स्फोट, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार..

महापौरपदासाठी एकूण पाच जणांचे अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननीनंतर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा शेख रशीद आणि शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मात्र, माघार घेण्यासाठी देण्यात आलेल्या 15 मिनिटांच्या मुदतीत इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यात सरळ लढत झाली.

मतमोजणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांना समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यासह बहुमतासाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर अर्थात 43 मते मिळाली. शिवसेनेच्या लता घोडगे यांना १८ मते मिळून त्यांचा पराभव झाला. तसेच इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याने समाजी वादी पार्टीच्या शान-ए-हिंद या उपमहापौरपदावर विराजमान झाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com