Chhava Morcha at Yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karan Gaikar Politics: हजारो कोटींच्या घोटाळ्यात अजित पवार सुटतात, मग कर्जमाफी का होत नाही?

Ajit Pawar Scam News: महायुती सरकारला घरचा आहेर, भाजपशी संबंधित संघटनेचा कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.

Sampat Devgire

Maharashtra Loan Waiver Issue: कर्जमाफीच्या प्रश्नावर महायुतीच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न महायुती सरकार साठी अडचणीचा ठरवू लागला आहे. आता येवल्यात महायुती सरकारला घरचा आहेर मिळाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हजारो कोटींच्या घोटाळ्यातून निर्दोष सुटतात. अदानी, अंबानी यांसारख्या मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात. पिक विम्याचे हजारो कोटींचे दावे दुर्लक्षित राहतात. मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही.

छावा क्रांतिवीर संघटनेने हा प्रश्न केला आहे. विशेष म्हणजे, या संघटनेच्या नेत्यांच्या कुटुंबीयांनी नुकताच भारतीय जनता पक्ष (BJP) प्रवेश केला आहे. आता त्यांनी येवल्यातून बैलगाडीसह शेतकऱ्यांचा मोर्चा काढून सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे कर्जमाफीचा हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे.

यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी यावेळी मोर्चा काढण्यात आला होता. राज्य शासनाने तातडीने कर्जमाफीचा निर्णय अन्यथा राज्यभर असेच बैलगाडी मोर्चे काढण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत जी भूमिका जाहीर केली आहे. त्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. अजित पवार हे राज्याचे मालक नसून सेवक आहेत. याचा त्यांना विसर पडला आहे. अजित पवार यांनी `मी बोललो नाही, त्यामुळे मी कर्जमाफी करणार नाही` असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीने अजित पवार यांना बाजूला सारून शेतकरी हिताचा कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा. महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे, अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट आणि महागडे शेतीचे कीटकनाशके आदींमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कडे शेती मालाला भाव नाही. कर्जमाफी आवश्यक बनली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची हजारो कोटींच्या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता होते. याचे अनेकांना आश्चर्य वाटते. अनेक मोठ्या उद्योगपतींची कर्ज शासन स्वतः माफ करते. हे सर्व निर्णय कसे होतात? सर्वसामान्य आणि गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार हात आखडता का घेते? असा सवाल यावेळी करण्यात आला.

छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष गायकर, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, आशिष हिरे, नवनाथ वैराळ, अविनाश शिंदे, प्रवीण पाटील यांसह संघटनेचे विविध नेत्यांनी यावेळी तहसीलदारांची चर्चेत भाग घेतला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT