MMS Nashik Protest: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात नद्यांच्या प्रदूषणावर संताप व्यक्त केला होता. आता नाशिकमध्ये मनसेने हा विषय हाती घेतला आहे. याबाबत महापालिके विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. प्रशासनापासून विविध संघटना आणि साधू महंतांनी ही त्यावर संताप व्यक्त केला होता. आता याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय झाली आहे.
राज ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे नाशिक शहरात मनसेचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. पक्षाचे सचिव दिनकर पाटील यांनी यासंदर्भात महापालिकेला थेट इशारा दिला आहे. या प्रश्नाकडे जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता थेट रामकुंडावरच निदर्शने करण्याची घोषणा त्यांनी केली.
यासंदर्भात दिनकर पाटील यांनी महापालिका या प्रश्नावर अत्यंत निष्क्रिय आहे, असे सांगितले. प्रशासन या संदर्भात कोणतीही कारवाई किंवा प्रदूषणाविरोधात काम करताना दिसत नाही. शहरातील नंदिनी, वालदेवी आणि दारणा या तीन नद्यांवर कोणतेही एसटीपी प्लांट उभारण्यात आलेले नाही. या नद्यांमध्ये परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले आहे.
गोदावरी नदीवर असलेले मलनिसाःरण प्रकल्प काम करताना दिसत नाही. या प्रकल्पांमध्ये सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. प्रक्रिया न करताचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली आहे. अगदी रामकुंडावर देखील पाणी योग्य राहिलेले नाही. ही सर्वसामान्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
गोदावरी नदीत गंगापूर गाव ते नांदूर मधमेश्वर पर्यंत पानवेली वाढल्या आहेत. या पानवेलींमुळे परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. पानवेलींमुळे पाण्याची गुणवत्ता घसरते प्रदूषण आणि सांडपाणी मिश्रित पाण्यामुळेच नदीपात्रात पानवेली वाढत आहेत. यासंदर्भात रामकुंडावर आंदोलन करून महापालिकेचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
कुंभमेळ्याबाबत प्रशासन रोज बैठका घेत आहेत. मात्र या बैठकांमधून काय निर्णय होतो आणि कोणती कामे सुरू होणार आहेत, याचा काहीही बोध होत नाही. त्यामुळे सध्या महापालिकेत फक्त कुंभमेळ्याच्या नावाने करमणूक सुरू असल्याचा आरोप देखील मनसेचे सचिव पाटील यांनी केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.