Rohit Pawar ED chargesheet Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar ED chargesheet : रोहित, पवारसाहेबांचं रक्त, लढणारच! 'ईडी'च्या दोषारोपपत्रावर जितेंद्र आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया

Jitendra Awhad Reacts to ED Chargesheet Against NCP MLA Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Jitendra Awhad on ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत-जामखेडमधील आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. या कार्यवाहीवर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजप महायुतीला सूचक, असा इशारा दिला.

"रोहित पवार यांना शांत करण्याचा हा उपाय नाही. ते पवारसाहेबांचं रक्त आहे. शांत बसणाऱ्यापैकी नाही. लढणारच!", असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, "या कारवाईत आश्चर्याची बाब आहे. महाराष्ट्रातील 97 लोकांवर EOW कारवाई केली आहे . त्या सर्व केसेस बंद करून चौकशी, अंती न्यायालयाला क्लोजर रिपोर्ट सादर आहे. त्यामध्ये कुठेही रोहित पवार यांचे नाव नाही. पण त्याच फिर्यादीचा आधार घेऊन 'ईडी'ने आपलं दोषारोपपत्रामध्ये 97 लोकांना सोडून रोहित पवार यांना धरलं". आमचा न्यायालयावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायालयाची लढाई लढू, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

'रोहितला हा शांत करण्याचा उपाय नाही. रोहित शांत बसणाऱ्यापैकी नाही. लढणारच! पवारसाहेबांचं रक्त आहे. ED काय करते, गावातील शेवटच्या शेतकऱ्याला देखील माहिती आहे. पूर्वी शेतकरी राजकीय चर्चा करायचा, आता चावडीवर 'ईडी'ची चर्चा होते. आम्ही कोणाची साथ सोडणारी माणसे नाही. जीवाभावाची लोक आहोत. साहेबांना अनेक मोठे लोकं सोडून गेले, तरी आम्ही उभे राहिलो. आम्ही पळणाऱ्यापैकी नाही', उभे राहणारे आहोत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. यापूर्वी 'ईडी'ने या प्रकरणी बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या 50 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती.

'ईडी'च्या दोषारोपपत्रात काय म्हटलं...

महाराष्ट्र राज्य सहकारीा बँक कथित गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकेत घेतल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर दोषारोपपत्रातून केला आहे. कन्नड एसएसके गिरणी ही रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो इथल्या कंपनीने 50 कोटी रुपयांना विकत घेतली होती. यासंबंधीत 'ईडी' तपास करत आहे.

'ईडी'ला इथं आहे संशय

बारामती अ‍ॅग्रोने कन्नड एसएसकेसाठी बोली लावण्यासाठी हायटेकशी संगनमत केले आणि चुकीच्या पद्धतीने बोली जिंकण्यासाठी लिलाव प्रक्रियेत फेरफार केला, असा संशय आहे. इथं हायटेककडे रक्कम हस्तांतरित झाल्याचा 'ईडी'ला संशय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT