Rohit pawar ram Shinde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karjat- Jamkhed News : कर्जत MIDC ची जागा बदलली, राम शिंदेंच्या निर्णयाला आव्हान

Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी पाटेगाव-खंडाळा येथील 458 हेक्टर प्रस्तावित जागा निश्चित केली होती. राज्यात सत्तांतर होताच जागा बदलण्याचा निर्णय भाजप आमदार राम शिंदे यांनी घेतला.

Pradeep Pendhare

Karjat Jamkhed Constituency : कर्जत-जामखेडमधील एमआयडीसीचा मुद्दा राज्यभर चर्चेत आहेत. भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. राज्यात सत्तांतर होताच, भाजप आमदार प्रा. शिंदे यांनी एमआयडीसीच्या जागेत बदल केला. यावरून आता कर्जतमधील पाटेगाव आणि खंडाळा ग्रामपंचायती आक्रमक झाल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सुरुवातीला राजकीय श्रेयात आणि आता न्यायालयाच्या कचाट्यात एमआयडीसी अडकली आहे.

कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी मौजे पाटेगाव-खंडाळा येथील 458 हेक्टर प्रस्तावित जागा निश्चित केली होती. मात्र, राम शिंदे यांनी जागा बदलून कोंभळी परिसरात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. वास्तविक पाहता पाटेगाव ग्रामपंचायतीने फक्त निवासी जागा आणि बागायती क्षेत्र वगळून एमआयडीसीसाठी जागा भूसंपादन करावी, असा ठराव घेतला होता. मात्र, राम शिंदे यांनी हा ठराव चुकीच्या पद्धतीने समोर आणला. राजकीय विरोध म्हणून जागा बदलली गेली, असा आरोप याचिकेत केल्याची माहिती वकील कैलास शेवाळे यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्जत-जामखेड Karjat- kamkhed MIDC एमआयडीसीसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून आमदार रोहित पवार यांनी पाटेगाव-खंडाळा जागा निश्चित केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन तिथे महायुती भाजपचे सरकार आले. सत्तांतर होताच राम शिंदे (Ram Shinde) यांनी राजकीय श्रेयासाठी जागेत बदल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी जी जागा निश्चित केली होती, ती दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी योग्य होती. मात्र, जागा चुकीची असल्याचा दावा करत आमदार शिंदेंनी प्रस्तावित एमआयडीसीला MIDC खीळ घातली. राज्याचे मंत्रिमंडळ आणि उद्योग विभागासमोर चुकीची माहिती दिली. वास्तविक पाहता मागील सरकारचे निर्णय पुढील सरकार बदलू शकत नाही. यासाठी पंजाब आणि हरियाणा सरकार निकालाच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आम्हास येथे उपयुक्त ठरणार असल्याचे वकील कैलास शेवाळे यांनी म्हटले.

मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ दाखल याचिकेची नक्कीच दखल घेईल. पाटेगाव आणि खंडाळा येथीलच जागा एमआयाडीसी उपयुक्त आहे. तसेच एमआयडीसीसाठी निश्चित केलेल्या जा जागेतून दोन्ही कर्जत-जामखेड (karjat- jamkhed) तालुक्यांचा विकास साधला जाऊ शकतो. त्यामुळे पाटेगाव आणि खंडाळा येथील जागा कायम करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आल्याचे वकील कैलास शेवाळे यांनी सांगितले.

वकील कैलास शेवाळे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. सरपंच मनीषा कदम, उपसरपंच नामदेव लाड, दादासाहेब पाटील, जान्हवी शेवाळे, सतीश डुकरे, गोकुळ इरकर, परशुराम लाड, सोपान जाधव, सतीश बेल्सकर, सचिन सुरवसे आदी या वेळी उपस्थित होते.

Edited By: Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT