MLA Ram Shinde, MLA Rohit Pawar. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar : रोहित पवारांना मोठा धक्का! 'हे' कारण देत प्रस्तावित कर्जत 'एमआयडीसी' रद्दबातल; राम शिंदेंची मोठी माहिती

Karjat MIDC Updates : कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी एमआयडीसी होण्याचे जवळपास निश्चित झाले होते

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या प्रस्तावित एमआयडीसीचा एकूणच प्रस्ताव रद्दबातल करण्यात आला आहे. याबाबत आज नागपूर अधिवेशनादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली.

या बैठकीला भाजपचे विधान परिषद सदस्य राम शिंदे यांच्यासह उद्योग आणि एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.संबंधित एमआयडीसीची जागा ही वादग्रस्त असल्याने हा प्रस्ताव रद्दबातल करण्यात येत असल्याचं यावेळी निर्णय झाल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे.

राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार असताना कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठं पाऊल उचलले होते. त्यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव-खंडाळा या ठिकाणी एमआयडीसीसाठी प्रस्ताव सरकारकडे दिला होता. एमआयडीसी होण्यासाठी हवे असलेल्या विविध परवानग्या, निरीक्षणे विविध शासकीय समित्याने नोंदवल्यानंतर या जागेवर एमआयडीसी होण्याचे जवळपास निश्चित झाले होते.(Karjat Midc)

दरम्यान, शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि त्यानंतर राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी कर्जत एमआयडीसीच्या अधिसूचनेला आवश्यक असलेली परवानगीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे अनेकदा अर्ज, परवानग्या मागितल्या. गेल्या दोन अधिवेशनात रोहित पवार यांनी हा मुद्दा जोरदारपणे लावून धरला होता. मात्र त्यानंतरही उद्योग मंत्रांनी अधिसूचनेवर सही न केल्याने हा प्रस्ताव प्रलंबित ठेवला गेला होता.

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज मंगळवारी प्रस्तावित कर्जत एमआयडीसी संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यासह उद्योग मंत्रालयाचे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीत प्रस्तावित कर्जत तालुक्यातील एमआयडीसीची जागा ही वादग्रस्त असल्याचं निष्कर्ष काढण्यात आला. या ठिकाणी मंजूर असलेल्या जागेत विदेशात पळून गेलेल्या निरव मोदी याची जागा मोठ्या प्रमाणात असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी सांगितला. त्याचबरोबर पाटेगाव ग्रामपंचायतीने एमआयडीसीने जागा देण्यास विरोध असल्याचा ठरावही सादर करण्यात आला.

एकंदरीत प्रस्तावित कर्जत एमआयडीसी जागा वादग्रस्त असल्याने सदर प्रस्तावच रद्दबाचल करण्यात येत असल्याची माहिती आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी दिली आहे. त्याचबरोबर लवकरच मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी एमआयडीसीसाठी नव्याने जागा शोधण्यात येणार असून यासाठीचा जागेचा प्रस्ताव येणाऱ्या पंधरा दिवसात उद्योग मंत्रालयाला सादर करावा असेही सांगण्यात आल्याची माहिती आमदार राम शिंदे यांनी दिली आहे. एकूणच आज झालेला निर्णय हा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे मानण्यात येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT