Pankaja Munde News : पिण्याला नाही म्हणत नाही, पण हातभट्टीची पिऊ नका; कार्यकर्त्यांना पंकजाताईंचा सल्ला

Pankaja Munde Statement On Drinking Liquor : कार्यकर्त्यांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे या चर्चेत आल्या आहेत...
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics News : गोपीनाथ गडावर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दारूबाबत एक सल्ला दिला. या सल्ल्याची आता जोरदार चर्चा आहे.

Pankaja Munde
Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

तंबाखू खाणारे कोण आहेत? असे त्यांनी कार्यकर्त्यांना विचारले. तंबाखू, पुड्या खाणे सोडा, तोंडाचा वास येतो. कुठेही काढून फेकतात. त्याने कॅन्सर होतो, असे पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाल्या. दारू प्यायची असेल तर हातभट्टीची पिऊ नका, त्याने विषबाधा होते. दारू प्यायला मी नाही म्हणत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. कार्यकर्त्यांना सल्ला देतानाचा पंकजा मुंडे यांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा कार्यकर्त्यांना काय बोलल्या?

रक्तदान शिबिरात पंकजा मुंडे यांनीही रक्तदान केले. यावेळी अनेक कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थकही तिथे उपस्थित होते. यावेळी पंकजा यांनी दारू बाबत कार्यकर्त्यांना सल्ला दिला. हातभट्टीची पिऊ नका. त्याने विषबाधा होते. पिण्याला मी नाही म्हणत नाही. तंबाखू आणि पुड्या खाणे बंद करा, खाऊन कुठेही थुंकू नका. त्याने कॅन्सर होतो. तंबाखू-पुड्या खाऊन तुम्ही मंदिराजवळ थुंकता, कसे दिसते ते. चांगले खा. मास, मच्छी फळभाज्या खा आणि निरोगी राहा, असे सल्ला पंकजा यांनी दिला. पण दारू पिण्याला नाही म्हणत नाही, असे म्हटल्याने पंकजा मुंडे या चर्चेत आल्या आहेत.

Pankaja Munde
Manoj Jarange Patil : आता माघार नाही म्हणजे नाहीच...! आजारी जरांगे पाटलांनी दवाखान्याच्या बेडहून सभास्थळ गाठलंच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com