Karjat Nagar Panchayat remove Ajit Pawar's funeral banners Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Tribute Removal : सभापती शिंदेंच्या ताब्यातील नगरपालिकेचा ‘प्रताप’! अजितदादांचे श्रद्धांजली फलक हटवले; युवक राष्ट्रवादीचा संताप

Ajit Pawar Tribute Photos Removed in Karjat, Yuva NCP Protests : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फलक काढण्यावरून कर्जत नगरपालिकेच्या कारभारावर युवक राष्ट्रवादीने संताप व्यक्त केला आहे.

Pradeep Pendhare

NCP Youth Wing Protest : भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या ताब्यात असलेली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत नगरपालिकेने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचे फोटो हटवले.

यावरून युवक राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिकाच्या कारभारावर संतापाली असून, निषेध केला आहे. मुख्याधिकारी यांनी कर्मचाऱ्यांकडून अनावधानाने हा प्रकार झाला असून, कोणाच्या भावना दुखवण्याचा हा प्रकार नसल्याचा खुलासा केला आहे.

कर्जत नगरपालिकेत भाजपची (BJP) सत्ता आहे. ही नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आठ अन् काँग्रेसचे तीन नगरसेवकांची फोडाफोडी झाली. आमदार रोहित पवार यांच्या ताब्यात असलेली, कर्जत नगरपालिका विधान परिषदेचे प्रा. राम शिंदे यांनी काबीज केली. आता याच नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराने थेट महायुतीमधील मित्रपक्षाच्या भावनेवर घाव घातल्याने, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आहेत.

कर्जत शहरात विविध ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे श्रद्धांजली फलक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावले आहेत. हे फलक कर्जत नगरपंचायतीने मंगळवारी हटवले. फलक हटवण्याची ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा गंभीर आरोप करत, कर्जतकर म्हणून निषेध करत असल्याचा घणाघात, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष धुमाळ यांनी केला.

कर्जत शहरात, विना परवानगीचे अनेक फलक आहेत. राज्याची मोठी हानी झालेल्या व्यक्तिमत्व काळानं हेरावून घेतलं आहे. त्यांच्याच श्रद्धांजलीचे फलकच नगरपालिकाला का खुपले? इतर विना परवाना फलक का खुपत नाहीत? असा त्रागा करत, कर्जत नगरपंचायतीचा युवक राष्ट्रवादीने निषेध केला.

कार्यकर्ते अजूनही दुःखात

मागील आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे बारामती इथं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अखंड महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने शोकसागरात बुडाला असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आजही अनावर आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली देणारे फलक कर्जत शहरासह तालुक्यात तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लागले आहे. मात्र कर्जत शहरातील श्रद्धांजली फलक कर्जत नगरपालिकेने काढण्याचा सपाटा सुरू केला.

राजकीय सुडबुद्धी दाखवली?

कर्जत नगरपालिकेने मुख्याधिकारी व विद्यमान पदाधिकारी यांनी केवळ राजकीत सुडबुद्धी दाखवतात जाणून-बुजून अजित पवार यांचे फलक काढून ते ट्रॅक्टरमध्ये आडवे-तिडवे टाकत विटंबना केली आहे. इतर विनापरवाना फोटो असताना, केवळ श्रद्धांजलीचे फलकच नगरपालिकेला सहन होत नव्हते का? असा सवाल केला जात आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे फलक लावले असताना कर्जतमध्येच ही कार्यवाही का ? असा सवाल पप्पू धुमाळ यांनी केला.

नगरपालिका प्रशासनाचा घाईघाईने खुलासा

दरम्यान, कर्जत शहरात काही विना परवानगी फलक लागले होते, ते काढण्याची प्रक्रिया कर्जत नगरपालिकेद्वारे सुरू होती. त्यात अनावधानाने कर्मचाऱ्यांकडून राज्याचा लोकनेता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही श्रद्धांजली फलक देखील काढले गेले.

ही बाब लक्षात येताच, त्यांचे पुढील काही फलक काढण्यात आले नाही. तसेच काढलेले फलक देखील लावण्यास सांगितले आहे. यात कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता, असा खुलासा मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT