Pankaja Munde helicopter issue : खडखडाटात उडलं.., मनात भीती.., मृत्यूच्या दारात नेणारं हेलिकॉप्टर! पंकजा मुंडेंचा धक्कादायक अनुभव!

Pankaja Munde Flags Serious Concern Over Helicopter Malfunction During Latur District Tour : भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी बिघडलेल्या हेलिकाॅप्टरवर प्रतिक्रिया देताना, गंभीर बाब नोंदवल्याने खळबळ उडाली आहे.
Pankaja Munde helicopter issue
Pankaja Munde helicopter issueSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics latest news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी मृत्यूनंतर नेत्यांचा हवाई प्रवास अन् त्याची सुरक्षिततेवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आता भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचं हेलिकाॅप्टर उड्डाणाअगोदरच तांत्रिक कारणाने उडू शकलं नसल्याची वृत्त झळकलं आहे.

परंतु, याच बंद पडलेल्या, जुनाट हेलिकाॅप्टरमधून काल पंकजा मुंडे यांनी प्रवास केला होता. त्याचवेळी त्यांनी हेलिकाॅप्टरविषयी गंभीर निरीक्षण नोंदवलं होतं. त्यामुळे उड्डाण कंपन्यांचं देत असलेल्या सर्व्हिसेसबाबत प्रश्चचिन्हं उपस्थित होऊ लागले आहेत.

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारदौऱ्यासाठी भाजप (BJP) मंत्री पंकजा मुंडे हवाईमार्गे प्रवास करत आहेत. आज त्यांच्या हेलिकाॅप्टरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते हेलिकाॅप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही. हेलिकाॅप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, उड्डाण होऊ शकले नाही, असे सांगण्यात आले.

हा प्रकार समोर येताच, अख्या महाराष्ट्रातनं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विषयी काळजी व्यक्त करत विचारपूस केली. पंकजाच्या आईने देखील त्यांना संपर्क करत, लोकसेवा, महाराष्ट्रसेवा करताना, काळजी घे, असे संपर्क करून सांगितले. आता या बिघडलेल्या हेलिकाॅप्टरबाबत पंकजा मुंडे यांनी धक्कादायक माहिती दिली.

Pankaja Munde helicopter issue
Praful Patel : शांत चेहरा, मोठा डाव! प्रफुल्ल पटेलांची राजकारणात एन्ट्री कशी झाली, अध्यक्षपदाची चर्चा का पेटली?

पंकजा मुंडे यांनी याच हेलिकाॅप्टरमधून काल प्रवास केल्याचं समोर आलं. या हेलिकाॅप्टरमध्ये बसल्या-बसल्या त्यांना खूप जुने वाटले होते. खूप आवाज येत होता, असे देखील निरीक्षण पंकजा मुंडे नोंदवले. यानंतर हेच हेलिकाॅप्टर उडणार नसल्याचं निरोप पंकजा मुंडे यांना मिळाला. यानंतर महाराष्ट्रभर, बिघाडलेल्या हेलिकाॅप्टरची, पंकजा यांची काळजी वाढवणारी, बातमी समोर आली.

Pankaja Munde helicopter issue
Marathi vs Non Marathi Dispute : मराठी युवकाला ‘घाटी’ म्हणत मारहाण; बांधकाम व्यावसायिकाची दादागिरी, मराठी स्वाभिमान भडकला

लाडकी बहीण योजना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव द्यावं, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर, मंत्री पंकजा मुंडे यांनी, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगितले. अजितदादांच्या अपघाताविषयी दिशाभूल झाली नाही पाहिजे, अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com