Karjat Court Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

No confidence Motion : कर्जत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव; न्यायालयाचा 'जैसे-थे'चा आदेश, आजची विशेष सभा रद्द

Karjat Nagar Panchayat President Rohini Ghule secured stay from Bombay High Court no-confidence motion, forcing Ahilyanagar district administration cancel special meeting : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधात आयोजित करण्यात आलेली आजची विशेष सभा रद्द करण्याचा नोटीस अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने काढली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांच्याविरोधातील अविश्वास ठरावाच्या मागणीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज विशेष सभा बोलाविण्यात आली होती.

मात्र तत्पूर्वीच नगराध्यक्षा घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने 'जैसे थे' स्थिती ठेवण्याचा आदेश दिला. या मुळे जिल्हाधिकारी यांच्या विशेष सभेला स्थगिती दिल्याने, आजची विशेष सभा रद्द करण्याची नोटीस अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा प्रशासनाने काढली आहे.

सात मे रोजी कर्जत नगरपंचायतीच्या गटनेता बदलानंतर 13 नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्यावर देखील अविश्वास मागणी प्रस्ताव दाखल केला होता. सदरच्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी यांनी कर्जतच्या प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करीत, आज नगराध्यक्षा घुले यांच्या अविश्वास मागणी प्रस्तावावर विशेष सभा आयोजित करण्याचे निर्देश दिले होते.

गटनेत्यानंतर नगराध्यक्षा देखील बदलले जातील का? यावर स्थानिक नेत्यांमध्ये पैजा झडत असताना, सायंकाळी रोहिणी घुले यांनी जिल्हाधिकारी यांच्या विशेष सभेच्या आदेशास उच्च न्यायालयाच्या (High Court) औरंगाबाद खंडपीठ यांच्याद्वारे स्थगिती घेतली. या मुळे आज जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली विशेष सभा रद्द करण्याची नामुष्की तालुका प्रशासनावर ओढावली.

सदरची विशेष सभा रद्द करण्याचा आदेश अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने दिले आहे. नगराध्यक्षा पदाच्या अविश्वासावर 11 जूनपर्यंत स्थगितीचा आदेश मिळाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या स्थगिती आदेशाने विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि कर्जतचे घुले बंधू यांच्यातील सत्ता संघर्षास तूर्तास तरी ब्रेक लागला असून, आगामी काळात या सत्तेच्या रस्सीखेचमध्ये कोण बाजी मारेल? याकडे देखील मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

प्रा. राम शिंदेंची प्रतिष्ठापणाला

कर्जत नगरपंचायतीचा काळ 27 जानेवारीमध्ये पूर्ण होत आहे. अवघ्या सात-आठ महिन्याच्या पदाधिकारी खुर्चीसाठी राजकीय व्यक्तिमत्वाच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नगरपंचायतीत सत्तांतर घडवताना, आपल्या सोशल मीडियावरून उर्वरित काळासाठी दोन नगराध्यक्षा राहतील, यात प्रथम रोहिणी घुले आणि दुसऱ्या टर्मसाठी छाया शेलार यांची नाव जाहीर केले होते.

रोहिणी घुलेंकडून कायदेशीर खेळी

मात्र पदाचा काळ पूर्ण झाल्यानंतर देखील, रोहिणी घुले यांनी राजीनामा न दिल्याने पदाधिकाऱ्यांतील असंतोष उफाळला आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली. यात मागील आठवड्यात गटनेत्याची विकेट पडली. आणि त्याच दिवशी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. परंतु रोहिणी घुले यांनी प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात नेत अविश्वास ठरावाला स्थगिती मिळवली. आता नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव पारित करणे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यासाठी आता प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT