Sachin Ghule Joins Shiv Sena : नगराध्यक्षांचा पती-दीर शिवसेनेत! राम शिंदेंच्या होमग्राऊंडवर ‘सत्ता गेम’ सुरू?

Sachin Ghule joins Shiv Sena political development: विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी कर्जत नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांमधील नगराध्यक्षपदाचा फाॅर्म्युल्याला एकनाथ शिंदे शिवसेना सुरूंग लावण्याच्या तयारीत.
Sachin Ghule Joins Shiv Sena
Sachin Ghule Joins Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Karjat BJP Mayor: सत्ताधारी महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेत दिवसेंदिवस राजकीय युद्ध पेटताना दिसत आहे. सातारा जिल्हा परिषदेतील राजकीय नाट्याचे पडसाद विधिमंडळात उमटले.

एकनाथ शिंदे शिवसेना भाजपविरोधात आक्रमक दिसत आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील, कर्जत नगरपालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.

सत्ताधारी भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांचे पती अन् दीर, घुले बंधूंनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश करत प्रा. राम शिंदे यांना धक्का दिला. यामुळे सत्ताधारी नगरसेवक सावध होत, त्यांनी प्रा. राम शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. या राजकीय घडामोडीमुळे वर्षभरापूर्वी कर्जत नगरपालिकेत झालेल्या सत्तांतराचा इतिहास पुन्हा वेगळ्या वाटानं समोर येताना दिसतो आहे.

कर्जत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांची सत्ता उलथवून लावत, प्रा. राम शिंदे यांनी तिथं वर्षभरापूर्वी भाजपची सत्ता आणली होती. सत्तेतील पदांचं वाटप करताना, सम-समान, असा फाॅर्म्यूला समोर ठेवला.

कर्जत नगरपालिकेला कार्यकाळ 18 महिन्यांचा राहिला होता. सत्तांतराच्या नाट्यात, प्रवीण घुले यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे सत्ता वाटपात, प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी नगराध्यक्षापदाचा कार्यकाळ नऊ-नऊ महिन्यांचा वाटून घेण्याचं ठरवलं. त्यानुसार घुले गटाला सुरवातीला नऊ महिने देण्यात आले. रोहिणी घुले या नगराध्यक्षापदावर सुरूवातीला संधी देण्यात आली.

Sachin Ghule Joins Shiv Sena
Rupali Chakankar Pressure Allegations : 'बिंग' फुटणार? अशोक खरात सावध; चाकणकरांचा पोलिसांवर थयथयाट? सर्व काही आलं समोर...

नगराध्यक्षांचे पती-दीर शिवसेनेत

फाॅर्म्युल्यानुसार रोहिणी घुले यांचा नगराध्यक्षा पदाचा कार्यकाळ 11 मार्चला संपला आहे. पण त्यांनी अजून खुर्ची सोडलेली नाही. यातच रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले आणि त्यांचे दीर प्रवीण घुले यांनी मुंबई गाठत, एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. कर्जत नगरपालिकेतील सत्ताधारी भाजपला हा मोठा धक्का बसला आहे.

Sachin Ghule Joins Shiv Sena
Fake Baba Ashok Kharat Nashik Case : महिलांच्या शोषणात भोंदूगिरीचा ‘खरात पॅटर्न’? रंजना गवांदेंनी मांडली धक्कादायक आकडेवारी...

भाजप नगरसेवकांची मुंबईत धावाधाव

घुले बंधूंच्या या राजकीय डावपेचानंतर, भाजप नगरसेवक अलर्ट झाले असून, दहा नगरसेवकांना मुंबईत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात भेट घेतली. तसा फोटो देखील समाज माध्यमांवर शेअर करत, आम्ही एकसंघ असल्याचा सूचक संदेश या नगरसेवकांनी घुले बंधूंना दिला.

नगराध्यक्षांसह तीन जण अनुपस्थित

भाजपचे कर्जत मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, नगरसेवक सतीश पाटील, संतोष मेहेत्रे, सुनील शेलार, लालासाहेब शेळके, देवा खरात, सचिन कुलथे, विनोद दळवी, रवी सुपेकर, ओंकार तोटे आणि दत्ता पिसाळ या भेटीत उपस्थित होते.

तर भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले, नगरसेवक भास्कर भैलुमे आणि भाऊसाहेब तोरडमल हे तीन पदाधिकारी अनुपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्याकडे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्ता समीकरणाचा वेगळा सूर कर्जतमध्ये चर्चेत येऊ लागला आहे.

कोण बाजी मारणार?

सहा एप्रिल 2025 रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 11 नगरसेवकांनी बंडखोरी करीत आमदार रोहित पवार यांच्या सत्तेला सुरूंग लावला होता. आमदार पवार यांच्या ताब्यातील नगरपंचायतीवर प्रा.राम शिंदेंनी बंडखोर नगरसेवकांना हाती घेत आपले वर्चस्व स्थापित केलं. दोन मे रोजी भाजपचा झेंडा सत्ताधारी म्हणून कर्जत नगरपालिकेवर फडकवला.

प्रा. शिंदेंकडे सत्तेसाठी 'हुकूमचा एक्का'

मात्र अवघ्या एकच वर्षांत पुन्हा सचिव व प्रवीण घुले बंधूंनी पक्षांतर केलं. घुले बंधूंच्या निर्णयाने भाजपच्या सत्तेला पुन्हा खीळ बसते की काय? अशी चर्चा आहे. प्रा. राम शिंदे यावर कसा मार्ग काढतात याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे. व्हिप बजावणारा गटनेता प्रा. राम शिंदेंबरोबर असल्याने अजूनही तरी भाजपची सत्ता कायम राहिल, असे दिसतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com