Karjat Nagar Panchayat : वर्षे-सव्वा वर्षाभरापूर्वी कर्जतमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांची सत्ता उलथावून लावली. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे या सत्तांतराचे चाणाक्य ठरले होते.
भाजपची सत्ता स्थापन करताना, नऊ-नऊ महिन्याचा फाॅर्म्युला ठरला होता. यानुसार आता नगराध्यक्षपदाची खुर्ची न सोडणाऱ्या रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत, अविश्वास ठराव दाखल केला आहे. या घडामोडीमुळे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात, मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
भाजप (BJP) नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावामध्ये, नगरपंचायतीचे कामकाज पाहताना कायद्याचे उल्लंघन करत असून, कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे त्यांनी विश्वास गमावला आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करता, त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार मनमानी पद्धतीने कारभार करतात. प्रभागातील नागरी समस्या सोडविताना, नगरसेवक विश्वासात घेत नाही.
लोकांच्या सेवेसाठी आवश्यक आरोग्य सेवा, शिक्षण, सांडपाणी विल्हेवाट करण्याची व्यवस्था करण्याच्या मागण्यांकडे हेतूपर्वक दुर्लक्ष करून, टाळाटाळ करतात. यासह इतर मुद्यांकडे नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल करत जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधलं आहे.
परंतु, या अविश्वास ठरावामागे राजकीय मोठी राजकीय घडामोड असल्याचे सांगितले जाते. नगराध्यक्ष रोहिणी घुले यांचे पती सचिन घुले यांनी दोन महिन्याभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी ते नऊ महिन्याभरापूर्वी युवका काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले. यानंतर सत्तांतरात उपनगराध्यक्षपदावरून, नगराध्यक्ष पदावर मजल मारली. पण आता, त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.
वर्षभरापूर्वी नगराध्यक्षांविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावेळी, पडद्यामागे ठरलेल्या राजकीय घडामोडींना पुन्हा उजाळा मिळाला. नगराध्यक्ष अविश्वास ठरावच्या मंजुरीच्या निर्णयात राज्य सरकारने मोठा बदल करत, राज्य सरकारचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतर केले.
यानंतर पहिलं सत्तांतर याच कर्जत नगरपंचायतीमध्ये झाले. आता पुन्हा याच नगरपंचायतीत पुन्हा भाजप नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. मात्र यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत.
गटनेते प्रा. सतीश पाटील, सुवर्णा सुपेकर, उषा राऊत, प्रतिभा भैलुमे, लंकाबाई खरात, छाया शेलार, अश्विनी दळवी, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, मोहिनी पिसाळ, नामदेव राऊत, अमृत काळदाते, ज्योती शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे.
कर्जत नगरपंचायतीत एकूण 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षांना हटवण्याची मागणी केली आहे. या अविश्वास ठरावानिमित्ताने, भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.