Six Councillors Disqualification Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Six Councillors Disqualification : कर्जतमध्ये पुन्हा राजकीय खळबळ; भाजपमध्ये गेलेल्या सहा नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस

Hearing fixed over six councillors' alleged whip violation in Karjat Nagar Panchayat : कर्जत नगरपंचायतीतील उपनगराध्यक्षावरील अविश्वास ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या सहा नगरसेवकांविरोधात अपात्रतेची मागणी करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Karjat Political News : कर्जत नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष पदाच्या अविश्वास ठरावानंतर सुरू झालेला राजकीय वाद आता अपात्रतेच्या कारवाईपर्यंत पोहोचला आहे.

अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला अनुपस्थित राहिलेल्या सहा नगरसेवकांविरोधात कारवाईची मागणी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने 22 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

गटनेते सतीश पाटील यांनी महाराष्ट्र (Maharashtra) स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, 1987 मधील संबंधित तरतुदींनुसार या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे. त्यानुसार सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) कार्यालयाकडून संबंधित नगरसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कर्जत नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांच्या विरोधात 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, ठरावावर मतदानासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेला सहा नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामध्ये भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेले माजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाचे नगरसेवकांचा समावेश आहे.

सभेत उपस्थित 11 नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. अनुपस्थित राहिलेल्या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप मोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. गटनेते सतीश पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 15 नगरसेवकांना सभेला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते, मात्र त्यातील सहा जण गैरहजर राहिल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक टार्गेट?

अपात्रतेची मागणी करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेसमधून निवडून आलेल्या रोहिणी घुले, मोनाली तोटे आणि भाऊसाहेब तोरडमल यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाच्या संतोष मेहेत्रे, ताराबाई कुलथे आणि भास्कर भैलुमे यांच्याविरोधातही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या सर्व नगरसेवकांनी यापूर्वी सत्तांतराच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता.

नगरसेवकांना उपस्थित राहण्याचा आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित सहा नगरसेवकांना नोटिसा बजावत आवश्यक कागदपत्रांसह 22 जुलै रोजी सुनावणीसाठी वैयक्तिक उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीनंतर या प्रकरणात पुढील निर्णय होणार आहे.

22 जुलैच्या सुनावणीकडे लक्ष

कर्जत नगरपंचायतीत राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. उपनगराध्यक्षावरील अविश्वास ठरावावेळी अनुपस्थित राहिलेल्या सहा नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली असून 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे स्थानिक राजकारणाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT