

Ahilyanagar DCC Bank Election : भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा सहकारी बँकेसाठी पॅनल जुळवण्यावर भर दिल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
यासाठी त्यांनी थेट काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांची भेट घेण्याची तयारी केली आहे. प्रा. राम शिंदे यांच्या या भूमिकेने अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या अनुषंगाने, अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. यासाठी त्यांनी गाठीभेटी वाढवल्या आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळून प्रा. राम शिंदे यांनी या गाठीभेटी सुरू केल्याने भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठी दुफळी असल्याचे संकेत राज्य पातळीवरील नेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. याशिवाय भाजपच्या राज्य नेत्यांकडूनच मंत्री विखे पाटील यांना वगळून प्रा. शिंदेंना बळ दिले जात असल्याची देखील चर्चा आहे.
भाजपच्या (BJP) प्रा. राम शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांची भेट घेतली. प्रा. शिंदे हे राजळे यांची भेट घेत असताना, मंत्री विखे पाटील देखील पाथर्डीत होते. पुढे सभापती प्रा. शिंदे आणि मंत्री विखे पाटील यांनी भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी स्वतंत्रपणे भेटी दिल्या.
मंत्री विखे पाटील यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातील टंचाई आढावा बैठक घेतली. त्यावेळी प्रा. शिंदे या बैठकीकडे फिरकले देखील नाही. प्रा. शिंदे हे आज संगमनेरच्या साकुरी येथे जात काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीनंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे त्यांच्या दौऱ्यात स्पष्ट करण्यात आले आहे. या दौऱ्यानिमित्ताने प्रा. राम शिंदे हे मंत्री विखे पाटील यांच्या समर्थकांना वगळून, विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बाळासाहेब थोरात-प्रा. राम शिंदे-खासदार नीलेश लंके-आमदार विवेक कोल्हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.