Bangladeshi infiltrators Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya : धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरात 3977 बांगलादेशी, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Kirit Somaiya Allegations : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सध्या बांगलादेशी नागरिकांचा विषय लावून धरला आहे. या संदर्भात ते सातत्याने मालेगाव शहराचा दौरा करीत आहेत. मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना जन्म दाखले दिल्याचा त्यांचा आरोप आहे.

Sampat Devgire

Malegaon News, 01 Feb : माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सध्या बांगलादेशी नागरिकांचा विषय लावून धरला आहे. या संदर्भात ते सातत्याने मालेगाव शहराचा दौरा करीत आहेत. मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना जन्म दाखले दिल्याचा त्यांचा आरोप आहे.

याबाबत त्यांनी काल विभागीय महसूल आयुक्त आणि पोलिस (Police) उपाधीक्षकांना निवेदन दिले. त्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार 977 बनावट जन्म दाखले देण्यात आल्याचा दावा केला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मालेगाव शहरात बांगलादेशी आणि रोहिंग्या असल्याच्या त्यांच्या दाव्याने प्रशासनही बुचकाळ्यात पडले आहे.

याबाबत तीन जणांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. हे तिन्ही लोक बांगलादेशी असल्याचा किरीट सोमय यांचा दावा आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी मात्र सायंकाळपर्यंत संबंधित कोण आणि ते बांगलादेशी (Bangladesh) आहेत का? याबाबत काहीही माहिती दिली नाही. या प्रकरणात तपास सुरू आहे एवढेच पोलिसांचे म्हणणे आहे.

भाजप नेते सोमय्या (Kirit Somaiya) मात्र या विषयावर अतिशय आक्रमक आहेत. या संदर्भात दाखले देण्यासाठी १२ एजंट महसूल विभागात काम करीत असल्याचा त्यांचा दावा आहे. दाखले देणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

याबाबत महसूल आणि महापालिका विभागातील जन्मदाखले देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एकंदरच भाजप (BJP) नेते सोमय्या यांचा दौरा पुन्हा एकदा मालेगावच्या राजकीय वातावरणाला नवी ऊर्जा देऊन गेला. या निमित्ताने आता पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मालेगावमधील बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांबाबत तपासणीसाठी 'एसआयटी' नियुक्त करण्यात आली आहे.

या समितीने अद्याप एकही बांगलादेशी सापडल्याचा दावा केलेला नाही. माजी खासदार सोमय्या यांनी 3977 बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्म दाखले दिल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. हा आरोप सोमय्या यांच्या शैलीनुसारच असल्याने प्रशासन तो गांभीर्याने घेणार का? आणि त्यात किती तथ्य आहे, हे समोर येणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT