Mumbai News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणानंतर बीडमधील वातावरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात असल्याने या प्रकरणात एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणी वाल्मिक कराडसह आठ आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्यावर गुणरत्न सदावर्तेनी गंभीर आरोप केले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांनी बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धस (Suresh Dhas) यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. तर हत्या प्रकरणातील हत्यारे हे सुरेश धस यांच्या शेतात सापडली होती का? असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. इतकंच नाहीतर आरोपींना पळून जाण्यासाठी सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रुपये दिले होते का? असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणा इतकेच गंभीर प्रकरण घडले असल्याचा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील बुट्ट्या गायकवाड यांचा जो खून झाला, या प्रकरणास भाजप (Bjp)आमदार सुरेश धस जबाबदार असल्याची टीका सदावर्ते यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्रे हे या तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत. धस यांना संतोष देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड राहिलेले नाही. धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत. उच्च जातीचे आहेत. ते तत्कालीन मंत्री होते. त्यांच्या कुटुंबांचा या प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे गायकवाड मर्डर केसचा पूर्णपणे छडा लागला पाहिजे, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलीस अधिकारी केंद्रे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन गेला पाहिजे. सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केसमधून काढता पाय घेण्यासाठी दिले असून हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले आहेत, असा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.