Kirit Somaiya With Police  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kirit Somaiya Politics: देशभऱ सर्व धर्मीय एकोपा, किरीट सोमय्या यांचे राजकारण मात्र मशिद आणि भोंगे यातच अडकले!

Kirit Somaiya;A picture of Hindu Muslim unity amidst India-Pakistan tension... But Somaiya's mosque is a myth-भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभर सर्वधर्मीय एकतेची भावना यावर भर. सर्व राजकीय पक्ष त्यासाठी संदेश देत आहेत.

Sampat Devgire

Kirit Somaiya News: सत्तेपासून दूर झाल्याने माजी खासदार किरीट सोमय्या हे अधिक आक्रमकपणे धार्मिक ध्रुवीकरणावर काम करीत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी सातत्याने ते विविध दौरे करून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असतात. त्यांचे हे राजकारण चर्चेचा विषय राहिले आहे.

भारत पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती आहे. देशांत युद्धसदृश्य परिस्थिती आहे. देशभरातील सर्व राजकीय पक्ष एक दिलाने केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे आहेत. त्यासाठी सर्व धर्मीय आणि विशेषतः हिंदू मुस्लिम एकतेचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि मुस्लिम संघटनांनीही या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा धिक्कार केला.

देशातील राजकारण काहीही असले तरीही भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मात्र आपला हेका सोडलेला नाही. माजी खासदार सोमय्या यांनी शनिवारी मुंबईतील दिंडोशी, मालाड आणि कुराड येथे भेटी दिल्या. पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून येथील मशिन वरील भोंगे काढण्याची मागणी केली. याबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.

याविषयी सोमय यांनी स्वतःच समाज माध्यमावर पोस्ट टाकली आहे. आगामी दहा दिवसात मशिदीवरील भोंगे काढण्यात येतील असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली असून पोलीस कारवाई करणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे विनायक कामत, विनोद मिश्रा, ज्ञानमूर्ती शर्मा आणि अन्य पदाधिकारी होते.

माजी खासदार सोमय्या यांनी गेले काही दिवस बांगलादेशी नागरिक या विषयावर आपले आक्रमक आंदोलन सुरू ठेवले होते. त्यासाठी मालेगाव, सटाणा, संभाजीनगर, जालना यांसह विविध शहरांना भेटी देऊन येथे बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा केला होता. या शहरात प्रत्यक्षात अद्याप एकही बांगलादेशी नागरिक आढळलेला नाही. मात्र अनधिकृत कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या दाखल्यामुळे काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी खासदार सोमय्या यांचे हे आंदोलन विरोधी पक्ष व नागरिकांच्या दृष्टीनेही टिकेचा विषय ठरले होते. देशभर सध्या भारत-पाक तणावाचे चित्र आहे. या स्थितीत नागरिकांत एकोप्याचे आणि परस्पर सौहार्दाचे वातावरण काळाची गरज आहे. मात्र भाजप नेते सोमय्या यांना त्याचे फारसे सोयरे सुतक वाटत नसावे. त्यांचा मशिद आणि भोंगे हा राजकीय राग आळवणे सुरूच आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT