Nitin Gadkari BJP : वाजपेयींची इच्छा, बाळासाहेब विखेंना सांगताच, मिळाला पूर्तीचा मार्ग; नितीन गडकरींनी मोठ्या योजनेचा किस्सा सांगितला!

Nitin Gadkari Shares PMGSY Story Linked to Atal Bihari Vajpayee & Balasaheb Vikhe Patil in Rahata Ahilyanagar : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी जोडलेला किस्सा सांगितला.
Nitin Gadkari BJP 1
Nitin Gadkari BJP 1Sarkarnama
Published on
Updated on

PMGSY story Nitin Gadkari : भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित अहिल्यानगरमधील विविध कामांचा प्रारंभ झाला. तसेच लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झालं.

मंत्री गडकरी यांनी दिवगंत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी निगडीत आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा कसा जन्म झाला, याचा किस्सा सांगितला.

भाजप (BJP) नितीन गडकरी यांनी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्याशी माझा अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता. ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास होताच. परंतु आर्थिक दृष्टिकोनातून कार्य करत आपले कर्तृत्व सिद्ध केले याचे, ते उत्तम उदाहरण होते, असं कौतुक केलं.

Nitin Gadkari BJP 1
India Pakistan war tensions : भारत-पाकिस्तानात कमालीचा तणाव; व्यापार सीमा बंद, महागाईचा भडका उडणार

विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकारी तत्त्वावर पहिला कारखाना इथं सुरू केला. वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ आणि विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीची मुहुर्तमेढ या जिल्ह्यात रोवली. केवळ मुहुर्तमेढ रोवून ते थांबले नाहीत, तर जे प्रकल्प हाती घेतले ते पूर्णही केले. त्यांनी उभा केलेला पाया बाळासाहेब विखे यांनी आणखी मजबूत व विकसित केल्याचे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

Nitin Gadkari BJP 1
Tuljapur transformation plan: सरकारचे 1866 कोटी, 3 वर्षे अन् लक्ष्य तुळजापूरच्या कायापालटाचे!

बाळासाहेब विखे यांचे ग्रामीण जीवनमानाबद्दल स्पष्ट विचार होते. देशातील ग्रामीण भागातील गोरगरिबांचे कल्याण कसे झाले पाहिजे, देशातला ग्रामीण भाग संपन्न- समृद्ध झाला पाहिजे, याच विकासाच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम कार्य केली. त्यातून पुढे सहकार क्षेत्रात काम करण्यासाठीही शक्ती मिळाली. त्यामुळे कार्यकर्तृत्व आणि नेतृत्व माझ्यासारख्या अनेकांसाठी प्रेरणादायी होते. ज्यांच्याकडून काही शिकता येईल, अशी माणसे हळूहळू कमी होत चालल्याची खंत देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

वाजपेयींची इच्छा विखेंना सांगितली

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना, बाळासाहेब विखे अर्थ राज्यमंत्री होते. गावोगावचे रस्ते जोडण्यासाठी योजना तयार करण्याचा आदेश मला वाजपेयी यांच्याकडून मिळाला होता. त्यानंतर मी बाळासाहेब विखे यांना भेटलो. वाजपेयी यांच्या या इच्छेबद्दल मी त्यांना सांगितले. मी अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे नाबार्ड व तत्सम संस्थांकडून जे सहाय्य आवश्यक असेल ते मी निश्चितपणे करेल, असे आश्वासन बाळासाहेब विखे यांनी दिले.

'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना'

ही योजना यशस्वी झालीच पाहिजे यासाठी शक्यतो प्रयत्न करा. योजनेचा सर्व आराखडा तयार केला. तो लवकरच मंजूर झाला आणि योजना अमलात आली व यशस्वी झाली, ती योजना म्हणजे 'प्रधानमंत्री ग्राम सडक योजना'! देशभरात साडेसहा लाख गावे आहेत. या सर्व गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचे काम कोणी केले असेल, तर ते त्या वेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com