Ranjana-gawande and Indurikar Maharaj  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Indurikar Maharaj News: इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ; आता उपअधीक्षकांमार्फत समन्स !

Sangamner Court : संगमनेर न्यायालयातील सुनावणीला इंदुरीकर महाराज गैरहजर राहिले...

Ganesh Thombare

Ahmednagar News: प्रसिद्ध प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात पीसी-पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन प्रकरणातील खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. शुक्रवारी संगमनेर न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीला इंदुरीकर महाराज गैरहजर होते. न्यायालयाचे समन्स बजावणाऱ्या पोलिसांना ते भेटले नाहीत, असा रिपोर्ट न्यायालयात सादर केला.

पण यावर अंनिसच्या कार्यकर्त्या तथा फिर्यादी वकील रंजना गवांदे यांनी न्यायालयाकडे इंदुरीकर महाराजांना समन्स बजवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्याची मागणी केली. इंदुरीकर महाराजांना पोलिस उपअधीक्षकांमार्फत समन्स बजावण्यात यावे, अशी मागणी फिर्यादी वकील रंजना गवांदे यांनी केली.

गर्भधारणा पूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्र कायद्याचे (पीसी-पीएनडीटी) इंदुरीकर महाराज यांच्याकडून कीर्तनात बोलताना उल्लंघन झाले. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या तथा फिर्यादी वकील रंजना गंवादे यांनी न्यायालयात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयीन लढाईनंतर इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेरच्या न्यायालयात आता खटल्यावर सुनावणी सुरू झाली आहे.

न्यायालयात हजर राहण्यासाठी न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना 13 सप्टेंबरला समन्स बजावले होते. खटल्याच्या सुनावणीसाठी आज 13 ऑक्टोबरची तारीख होती. या महिनाभराच्या कालावधीत संगमनेर पोलिसांना इंदुरीकर महाराज यांना समन्स बजावयाचे होते. मात्र, संगमनेर पोलिसांना इंदुरीकर महाराज सापडले नाहीत. न्यायालयात याचा रिपोर्ट सादर करताना पोलिसांनी इंदुरीकर महाराज भेटले नाहीत, असे म्हटले आहे.

संगमनेर पोलिसांच्या या रिपोर्टवर फिर्यादी वकील रंजना गवांदे यांनी न्यायालयाकडे इंदुरीकर महाराज यांना पोलिस उपअधीक्षकांमार्फत समन्स बजावण्याची मागणी केली. समन्स बजावण्यासाठी पोलिसांकडे एक महिन्याचा कालावधी होता.

तरी ते भेटले नाहीत, असे होणार नाही. परंतु असे वारंवार झाल्यास याबाबत न्यायालयाकडे योग्य ती दाद मागितली जाईल, असे रंजना गवांदे यांनी सांगितले. फिर्यादी वकील गंवादे यांनी पोलिस उपअधीक्षकांमार्फत समन्स बजावण्याची मागणी केल्याने इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT