Indurikar Maharaj News : इंदुरीकर महाराजांच्या घरच्या व्हरांड्यात 'तो' दबक्या पावलांनी आला, अन्...!

Leopard At Indurikar Maharaj Home : कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज हे त्यांच्या कीर्तन शैलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.
Indurikar Maharaj
Indurikar MaharajSarkarnama

Ahmednagar News : कीर्तनकार निवृत्ती देशमुख महाराज (इंदुरीकर) हे त्यांच्या कीर्तन शैलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. त्यांच्या कीर्तनातील काही मुद्द्यांवर वाददेखील उफाळलेले आहे. हे वाद न्यायालयात (Court) सुरू आहेत. मात्र, इंदुरीकर महाराज आणि त्यांचे घर आता एका वन्यप्राण्यामुळे चर्चेत आले आहे.

हा वन्यप्राणी बिबट्या आहे. संगमनेर तालुक्यातील ओझर या ठिकाणी इंदुरीकर महाराजांचे घर आहे. या घराच्या परिसरात दबक्या पावलांनी आलेल्या बिबट्याने इंदुरीकर यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार केली. बिबट्याच्या या शिकारीचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

इंदुरीकर यांचे संगमनेर (Sangamner) तालुक्यातील ओझर येथे घर आहे. बिबट्या त्यांच्या घराच्या परिसरात वावरत असलेली पाच ऑक्टोबरच्या रात्री साडेआठ वाजताची घटना आहे. त्यावेळी त्यांच्या घरासमोर दोन कुत्री बसली होती. त्याचवेळी तिथे बिबट्या आला. दोन कुत्र्यांपैकी एका कुत्र्याची शिकार बिबट्याने केली आणि उचलून घेऊन गेला.

Indurikar Maharaj
Ajit Pawar News: मोठी बातमी ! अजित पवारांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा

या वेळी दुसरा कुत्रा बिबट्यामागे जात भुंकत होता. कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाबरोबर एक मुलगी घरातून धावत बाहेर आली. तोपर्यंत बिबट्या हा शिकार केलेल्या कुत्र्याला घेऊन निघाला होता. बिबट्याला पाहून मुलगी घाबरून मागे फिरली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

इंदुरीकर महाराज यांच्या घरासमोरील व्हरांड्यात येऊन बिबट्या कुत्र्याची शिकार करून गेल्याची चर्चा महाराष्ट्रात (Maharashtra) रंगली आहे. ओझरमध्ये ग्रामस्थांमध्येदेखील भीतीचे वातावरण आहे. ओझर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शेतशिवाराचे प्रमाण मोठे आहे. प्रवरा नदीकाठचा परिसर असल्याने ऊस लागवड क्षेत्र मोठे आहे.

तसेच या भागांमध्ये अलीकडच्या काळात बिबट्यांचा वावर वाढला आहे. एक पेक्षा अधिक बिबट्यांचा वावर या परिसरात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन्य विभागाने बिबट्यांना पकडण्यासाठी स्थानिक परिसरात पिंजरा लावण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Indurikar Maharaj
Rajasthan Politics: वसुंधरा राजेंना भाजपचा दणका; पहिल्या यादीत तर पत्ता कट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com