Gulabrao Patil, Kishor Patil & vaishali Suryawanshi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kishor Patil politics: गुलाबराव पाटील यांची भीती खरी ठरली... पाचोर्‍यात शिंदे गटापुढे घऱचे झाले थो़डे...

Kishor Patil politics, Patil will face oppose from alliance and house both-आमदार किशोर पाटील यांना घरातूनच आव्हान होते आता महायुतीतूनही सहकाऱ्यांनीच दिले बंडखोरीचे आव्हान.

Sampat Devgire

Kishore Patil News: निवडणूक जवळ आल्याने महायुतीतील मतभेद ठळकपणे पुढे येऊ लागले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या राजकारणाविषयी महायुतीला इशारा दिला होता. तो खरा ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना बंडखोरी केल्याने गेले वर्षभर घरातूनच विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांनी शिवसेना ठाकरे गटात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीमती सूर्यवंशी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या आमदार किशोर पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे समर्थक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. यानिमित्ताने घरातूनच त्यांना आव्हान मिळाले आहे.

श्रीमती सूर्यवंशी यांनी संबंध मतदार संघात संपर्क दौरा केला आहे. पक्षाची संघटना बांधण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आमदार पाटील यांना अपेक्षेप्रमाणे महायुतीतूनच जाहीर विरोध सुरू झाला आहे.

पाचोरा मतदारसंघात गेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत सध्या भाजपचे विधानसभा प्रमुख असलेले अमोल शिंदे यांनी युती असूनही शिवसेनेच्या आमदार किशोर पाटील यांनी यांच्या विरोधात बंड केले होते. त्यावेळीही त्यांनी युतीचा धर्म पाळला नव्हता.

त्या अटीतटीच्या निवडणुकीत अमोल शिंदे हे अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झाले होते. या पार्श्वभूमीवर गेली पाच वर्ष ते निवडणुकीची तयारी करीत होते. आता ते महायुतीचाच घटक असलेल्या आणदार पाटील यांना पुन्हा आव्हान देणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप वाघ महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार आहेत. याशिवाय प्रताप पाटील आणि डॉ निळकंठ पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. या सर्व राजकीय गोंधळात मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरते की काय अशी स्थिती आहे.

पाचोरा- भडगाव विमतदारसंघासाठी सोमवारी महायुतीचा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी भाजपच्या खासदार स्मिता वाघ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र भाजपचा एकही पदाधिकारी या मेळाव्याला फिरकला नाही.

महायुतीचे आमदार किशोर पाटील यांना भाजपने योग्य तो राजकीय संदेश दिला आहे. यंदाही महायुतीचे दोन उमेदवार समोरासमोर असतील. हे भाजपच्या बंडखोरीने स्पष्ट झाले आहे. आमदार पाटील यांना महाविकास आघाडीचे अर्थात शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी घरातूनच आव्हान दिले आहे.

आता आमदार पाटील यांना महायुतीतूनही आव्हान मिळाल्याने ते या दुहेरी राजकीय आव्हानाचा सामना कसा करणार? हा चर्चेचा विषय आहे. यामध्ये पाणीपुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांची एकत्र राहिलो तर सर्व जागा जिंकू, अन्यथा अडचणी वाढतील ही भीती खरी ठरण्याची शक्यता आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT