Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Dhanraj Mahale & Narhari ZirwalSarkarnama

Narhari Zirwal Politics: धनराज महाले झिरवळांवर घसरले, "ते तर सर्कशीतले विदूषकी चाळे"

Dhanraj Mahale; Zirwal clowns, do not solve any issues of constituency-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांना आता शिवसेना एकनाथ शिंदे गटानेच दिले थेट आव्हान.
Published on

Zirwal Vs Mahale News: आदिवासी आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य शासनाच्या विरोधात आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात आंदोलन केले. यावेळी त्यांनी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारल्या. त्यावरून आता मतदारसंघातही टीका झाली आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी धनगर समाजाला आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण देऊ नये याला विरोध केला. या प्रश्नावर त्यांनी मंत्रालयात जाळ्यांवर उड्या घेत सगळ्यांचे लक्ष वेधले. मात्र त्यावरून विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ टीकेचे लक्ष्य झाले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांसह विविध नेत्यांनी झिरवाळ यांची कान उघडणी केली होती. आता झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदार संघातूनच त्यावर दोन मतप्रवाह आहेत. एका गटाने त्यांचा सत्कार केला तर दुसऱ्या गटाने त्यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनी आमदार झिरवाळ यांना पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. ते म्हणाले पेसा अंतर्गत उमेदवारांच्या नियुक्ती प्रदीर्घकाळ रखडले आहेत. त्या विरुद्ध नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचे मोठे आंदोलन झाले.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Narhari Zirwal Politics: नरहरी झिरवाळ यांचे राज ठाकरेंना कडक उत्तर, म्हणाले...

तो प्रश्न अद्यापही कायम आहे. आता त्यावर राज्य शासनाकडून कंत्राटी भरतीचा मार्ग काढण्यात आला आहे. याचा अर्थ हा प्रश्न सुटलेला नाही. मग आमदार झिरवाळ यांनी काय केले? आमदार झिरवाळ हे संवैधानिक पदावर काम करतात. त्यांना या गोष्टी समजत नाहीत का? काहीही न करता माझा उदो उदो करा, असा संदेश ते त्यांच्या समर्थकांना ते देत असावेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार झिरवाळ यांच्या मतदारसंघात त्यांनी अनेक घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. विकासाच्या दृष्टीने अनेक अडचणी कायम आहेत. मतदारांचे प्रश्न सुटलेले नाहीत.

संवैधानिक पदावर काम करणारे झिरवाळ हे मात्र नाचणे, नाटक करणे, सर्कशीतल्या विदूषकासारख्या जाळ्यांवर उड्या मारणे, सत्कार करून घेणे यामध्ये व्यस्त आहेत. मतदारसंघात झालेला सत्कार तर कदाचित त्यांनी स्वतःच घडवून आणला की काय? असे वाटते.

Dhanraj Mahale & Narhari Zirwal
Sameer Bhujbal Politics: समीर भुजबळांची एन्ट्री आमदार सुहास कांदे यांच्या पथ्यावर की अडचणीची?

सामान्य जनतेला आमदार झिरवाळ यांचे हे वागणे अजिबात आवडलेले नाही. त्याचे परिणाम त्यांना येत्या निवडणुकीत दिसून येतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील झिरवाळ यांचे खरे स्वरूप ओळखावे, असे माजी आमदार महाले म्हणाले.

आगामी निवडणुकीत मी झिरवाळ यांच्या विरोधात उमेदवारी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राज्याच्या विकासाबाबत आम्ही मतदार संघात गेले दोन महिने संवाद दौरे करीत आहोत. त्यामुळे मी उमेदवारी करण्यावर ठाम आहे, असे देखील महाले यांनी सांगितले

दिंडोरी मतदार संघात यानिमित्ताने पुन्हा एकदा आमदार झिरवाळ विरुद्ध माजी आमदार धनराज महाले यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे. दोघांनीही एकमेका विरुद्ध उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे महायुतीतच बंडखोरीचा मोठा भडका उडणार आहे. आमदार झिरवाळ यांची डोकेदुखी या निमित्ताने वाढणार हे नक्की.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com