Vivek Kolhe Vs Ashutosh Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vivek Kolhe Vs Ashutosh Kale : विवेक कोल्हेंचा 'धोकातंत्रा'वर घणाघात, तर काळे समर्थकांकडून 'महाकुंडल्या' काढण्याचा इशारा

Kopargaon Election: Vivek Kolhe & MLA Ashutosh Kale Supporters Show Strength During Nomination : कोपरगाव नगरपालिकेसाठी आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.

Pradeep Pendhare

Kopargaon Municipality Election : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची असली, तरी नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र आहे.

कोपरगावमध्ये भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांच्यात वाक् युद्ध रंगताना दिसत आहे. यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

कोपरगाव (Kopargaon) नगरपालिका निवडणुकीसाठी विवेक कोल्हे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. विवेक कोल्हे यांच्या समर्थकांनी प्रभागनिहाय मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन केलं. समर्थकांचे अर्ज दाखल करताना माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन न करता आपले अर्ज दाखल केले. यावेळी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.

भाजप (BJP), आरपीआय व मित्रपक्षाच्यावतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे ऊर्फ काका आणि त्यांच्या उमेदवारांनी प्रभागनिहाय अर्ज दाखल केले.

विवेक कोल्हेंचा घणाघात

विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर निशाणा साधला. 'आमचा नगराध्यक्षपदाचा चेहरा आयात नाही. बाहेरच्यांनी सांगण्यावरून आमची उमेदवारी नाही. विरोधकांनी उमेदवारी जाहीर करताना आमदारांनी हा धक्कातंत्र दिल्याचे म्हटले, मात्र हे धक्का नव्हे, धोकातंत्र आहे. कोपरगावकर त्यांचा योग्य समाचार घेतील,' असा घणाघात विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांचे नाव न घेता केला.

रस्ते गेले कुठे

'रस्ते, पाणी, रोजगार, स्वच्छता, नदी संवर्धन, सुशोभीकरण हे विकासाचे व्हिजन लोकसेवा आघाडीने ठेवले आहे. पालिकेत सत्ता आल्यावर प्रभागनिहाय पालिका आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चार वर्षापासून पालिकेत प्रशासक व आमदारांचे वर्चस्व आहे. या काळात शहरातील रस्त्यांवर प्रचंड खर्च होऊन, ते उखडलेले आहेत. विरोधी हेलिकॉप्टर पुढारी जमिनीवर उतरलेलेच नाही,' असा टोला देखील विवेक कोल्हे यांनी लगावला.

आमदार काळेंचं विकास व्हिजन

आमदार आशुतोष काळे यांनी, विधानसभा निवडणुकीत शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. पुढील काळात दररोज किंवा दिवसाआड पाणी मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे विकासाचे व्हिजन आहे आणि जनता विकासासोबत आहे, असे सांगितले.

महाकुंडल्या काढण्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांनी, 'मला विश्वास आहे की, विरोधक अशा कुंडलीच्या भानगडीत पडणार नाही आणि त्यांनी पडू पण नये. नाहीतर आमच्याकडे पण विरोधी उमेदवारांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या महाकुंडल्या आहे,' असा इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT