

Nagar Panchayat Election 2025: महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु आहे. सध्या पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. येत्या २ डिसेंबर रोजी यासाठी मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. पण काल या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख होती. यानिमित्त ज्यांना स्थानिक नेत्यांनी उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे. कारण पक्षानं स्थानिक नेत्यांवर सोपवलेल्या अधिकारांचा गैरवापर करुन त्यांनी आपल्या घरातच उमेदवाऱ्या दिल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज्यभरात सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अर्थात आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आपल्या घरांमधील पत्नी, मुलगी, मुलगा, सुना, सासरे अशा सर्वांना उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असल्याचं कायम सांगितलं जातं. त्यासाठी निवडून येऊन सत्ता राखण्यासाठी युत्या आघाड्या करा किंवा करु नका याबाबत स्थानिक नेत्यांना बहुतेकवेळा राजकीय पक्षांकडून पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं. यामध्ये लोकसभा, विधानसभेसाठी राबराब राबणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील राजकीय प्रवाहात येऊन अधिकारवाणीनं काम करण्यासाठी या निवडणुकांमध्ये संधी देणं अपेक्षित असतं.
पण राजकीय पक्षांनी स्थानिक नेत्यांना दिलेल्या या स्वातंत्र्याचा त्यांनी अक्षरशः गैरफायदा घेतल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं नेत्यांचे कुटुंबिय हे 'तुपाशी आहेत तर कार्यकर्ते मात्र उपाशीच' राहिले आहेत. त्यांनी कायमच नेत्यांच्या सतरंज्याच उचलायच्या आहेत, असा स्पष्ट संदेशही या नेत्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील राजकारण अशा विदारक स्थितीत पोहोचल्याचं चित्र या निवडणुकांच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे.
जामनेर - साधना महाजन (गिरीश महाजन यांच्या पत्नी)
भुसावळ - रजनी सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी)
पुसद - मोहिनी नाईक (राजमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी)
मुक्ताईनगर - संजना पाटील (मंत्री चंद्रकांत पाटील मुलगी)
चाळीसगाव - प्रतिभा चव्हाण (आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी)
पाचोरा - सुनिता पाटील ( आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी)
पाचोरा - सुचिता वाघ (माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी)
खामगाव - अर्पणा फुंडकर (मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिणी)
यवतमाळ - प्रियदर्शनी उईके (मंत्री अशोक उईके यांची मुलगी)
फलटण - अनिकेत नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षपदासाठी (रामराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा)
फलटण- समशेर सिंह, नगराध्यक्षपदासाठी (रणजीतसिंह निंबाळकर यांचा भाऊ)
सिल्लोड - समीर सत्तार, नगराध्यक्षपदासाठी (आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा)
हिंगोली - रेखा श्रीराम बांगर, नगराध्यक्षपदासाठी (आमदार संतोष बांगर यांची वहिनी) तसंच भावाचाही नगरसेवकपदासाठी अर्ज
पैठण - अनिल घोडके, नगरसेवकपदासाठी (माजी आमदार चंद्रकांत घोडके यांचा मुलगा)
गंगापूर - ऋषिकेश पाटील, नगराध्यक्षपदासाठी (माजी आमदार कैलास पाटील यांचा मुलगा)
जिंतूर - माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या
सेलू - संदीप लहाने, नगरसेवकपदासाठी (माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा मुलगा)
परतूर (जालना) - निलम जेथलिया, नगरसेवकपदासाठी (माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या पत्नी)
अंबड - उज्ज्वल कुचे (आमदार नारायण कुचे यांचे पुतणे)
बीड - गीता पवार (लक्ष्मण पवार यांच्या भावजय)
गेवराई- दिवंगत आमदार भालचंद्र कुलकर्णी यांच्या कुटुंबातील तीन सदस्य उभे आहेत.
सोनपेठ (परभणी) - सारीका भोसले (आमदार राजेश विटेकर यांच्या वहिणी)
जालना - विश्वजीत खरात (माजी आमदार विलास खरात यांचे पुत्र)
बीड - डॉ. सारिका क्षीरसागर, नगरसेवकपदासाठी (डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी)
अंबाजोगाई - नंदकिशोर मुंदडा, नगराध्यक्षपदासाठी (आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे)
गंगाखेड - उर्मिला केंद्रे, नगराध्यक्षपदासाठी (आमदार धनंजय मुंडे यांच्या भगिनी)
दोंडाई - नयनकुमार रावल, नगराध्यक्षपदासाठी (मंत्री जयकुमार रावल यांच्या आई)
अकोट- नलिनी भारसाकळे, नगराध्यक्षपदासाठी (आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी)
बुलडाणा - पूजा गायकवाड (आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी)
अकोट - अलका बोडके, नगराध्यक्षपदासाठी (माजी मंत्री रामदास बोडके यांच्या सुनबाई)
बाळापूर - नातिकोद्दीन खातीब यांच्या पत्नी रजिया बेगम खातीब यांना उमेदवारी
देवळाली - शोभा तडस, नगराध्यक्षपदासाठी (वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी)
अक्कलकोट - मिलन शेट्टी, नगराध्यक्षपदासाठी (आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे भाऊ)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.