Vivek Kolhe | Ashutosh Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kopargaon Politics : काळे-कोल्हे पुन्हा भिडणार? बरचं काही राजकीय शिजणार

Local self-government elections Kale vs Kolhe Rivalry: विधानसभा निवडणुकीला कोपरगावमध्ये काळे-कोल्हे सहमती एक्सप्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीचा राजकीय धुरळा शांत झालाय. आता महायुतीत सत्तास्थापनेचे नाट्य रंगलं आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला होत आहे. यानंतर लगेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी पुन्हा राज्यातील राजकीय वातावरण तापलं. तसं ते तापू लागलं आहे. विरोधात असून देखील विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते एकत्र लढले.

आता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेला एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, असे चित्र असून, त्याची पहिली ठिणगी महायुती पडताना दिसू लागली आहे. कोपरगावमध्ये काळे-कोल्हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात मैदानात दिसतील, आणि त्याची तयारी दोघांच्याही कार्यकर्त्यांनी करण्यास सुरवात केली आहे.

विधानसभा निवडणुकीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) युवा नेते विवेक कोल्हे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची सहमती एक्सप्रेस चांगलीच धावली. ही सहमीत व्हावी, यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी पुढाकार घेतला. विवेक कोल्हे यांचा राजकीय संघर्षाची दखल घेत विवेक कोल्हे यांची फडणवीस यांनी कोल्हे मायलेकाची भेट भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी घडवून आणली.

कोल्हे मायलेकरांची शाह यांच्याबरोबर यशस्वी बैठक झाल्यानंतर कोल्हे परिवाराने विधानसभा निवडणुकीतून (Election) माघार घेतली. कोल्हे यांचा हा निर्णय फायद्याचा ठरला. आशुतोष काळे यांना मतदारसंघात एकतर्फी निवडणूक झाली. सर्वाधिक मताधिक्य घेणारे आशुतोष काळे यांना राज्यातील पहिल्या पाच आमदारांमध्ये स्थान मिळाले.

विधानसभा निवडणुकीला धावलेली ही सहमती एक्सप्रेस आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धावणार का, अशी चर्चा सुरू असतानाच, त्यावर प्रमुख दोन्ही बाजूचे नेते बोलत नसतानाच, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या चूल मांडण्या सुरवात केलीय. यातच कोपरगाव मतदारसंघात काळे-कोल्हे या दोन्ही घरण्याची ताकद आहे. विधानसभेला आशुतोष काळे यांना मिळालेले यश मोठे असले, तरी विवेक कोल्हे यांनी भाजप नेत्यांच्या मध्यस्थीने थांबण्याची घेतलेल्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच गेल्या 50 वर्षात पहिल्यांदाच कोल्हे परिवार विधानसभा निवडणुकीपासून लांब राहिला आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांचे बळ यावेळी कोल्हे यांच्या बाजूने असणार हे नक्की!

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काळे-कोल्हे एक्सप्रेस एकत्र धावणार नाही, हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने गटतटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. काही शक्यता देखील वर्तवल्या जाऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेसाठी भाजपचे कोल्हे आणि शिवसेनेचे नितीन औताडे यांची युती होण्याची, तर राष्ट्रवादीचे आमदार काळे आणि परजणे गटाची युती होण्याची शक्यता आहे. यातच महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढवू शकते. त्यामुळे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT