NCP Politics : अजितदादांचा आमदार भिडतोय खासदार लंकेंना, दबंगगिरी उपटून फेकणार

Ajit Pawar Kashinath Date NCP SharadChandra Pawar party Nilesh Lanke Parner : पारनेर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार काशीनाथ दाते यांनी खासदार नीलेश लंके यांना आव्हान देण्यास सुरवात केली आहे.
Kashinath Date
Kashinath Date Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अजित पवार यांचा पारनेरमधील आमदार काशीनाथ दाते यांचा विजयानंतर कॉन्फिडन्स वाढला असून, थेट खासदार नीलेश लंके यांना आव्हान देण्यास सुरवात केली आहे.

"पारनेरमध्ये पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दबंगगिरीला नागरिक कंटाळले आहेत. हीच दबंगगिरी आता मुळासह उपटून फेकून द्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशा प्रवृत्तींच्या लोकांना गाडून टाका", असे आवाहन आमदार दाते यांनी करताना खासदार लंके यांना नाव न घेता डिवचले.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळेनर इथं आमदार दाते यांच्या विजयाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी थेट खासदार लंके यांना आव्हान दिले. माझ्या विजयासाठी माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि शिवाजी कर्डिले यांनी जीवाचे रान केल्याचेही काशीनाथ दाते यांनी म्हटले.

Kashinath Date
BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार काशीनाथ दाते म्हणाले, "पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपासून सुरू असलेल्या दंबगगिरीला नागरिक कंटाळले आहेत. हीच दबंगगिरी आता मुळासह उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. वाईट प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधीपासून तरुण, युवकांनी सावध राहावे". आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अशा प्रवृत्तीच्या लोकांना गाडून टाका, असे आवाहन आमदार दाते यांनी केले.

Kashinath Date
Shivaji Kardile : शेतकरी, कार्यकर्त्यांच्या ऊसतोडीसाठी टाळाटाळ; आमदार कर्डिलेंचा विरोधकांना इशारा

आमदार दाते यांनी आपल्या विजयात माजी खासदार सुजय विखे आणि शिवाजी कर्डिले यांचा मोठा वाटा असल्याचे सांगताना खासदार लंकेंवर पुन्हा निशाणा साधला. मी दहावे, अंत्यविधी आणि वाढदिवसाला जातो. मात्र त्याचे कधीच फोटोसेशन करत नाही. गेल्या पाच वर्षांत प्रसिद्धीचा नवीन फंडा आला आहे. दुखद घटनेचीही प्रसिद्धी केली जाते, असे लोकप्रतिनिधी जन्माला आले आहेत. त्यांचा पाच वर्षांचा कार्यक्रम विधानसभेच्या निवडणुकीत केला. हाच कार्यक्रम लोकसभा निवडणुकीत व्हायला पाहिजे होता, असेही आमदार दाते यांनी म्हटले.

मला प्रचारासाठी फक्त 12 दिवस मिळाले

समोरच्या उमेदवाराला प्रचारासाठी खूप वेळ मिळाला. मोहटादेवी दर्शन, महिलांना घरपोच साड्या, यात्रा असे अनेक प्रकार झाले. मला फक्त 12 दिवस प्रचारासाठी मिळाले. पारनेरपेक्षा मला अहिल्यानगर तालुक्यातील मतदारांनी माझ्यावर चांगला विश्वास दाखवला. शेवटपर्यंत मताधिक्य दिले. लोकप्रतिनिधींच्या दबंगगिरीला युवक, तरुण कंटाळले आहेत. पाच वर्षांत रोजगार उपलब्ध करून देतील, असे कोणतेही काम केलेले नाही. त्यांना फक्त लंके प्रतिष्ठान राज्यात मोठे करायचे आहेत, अशी टीका देखील काशीनाथ दाते यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com