Road accident Maharashtra : अहिल्यानगर-मनमाड रोडने काल रात्री एका युवकाचा पुन्हा जीव घेतला. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून चालेल्या युवकाला जड वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
कोपरगावमध्ये झालेल्या या घटनेने युवकांनी आज संताप व्यक्त करत, राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश व्यक्त करत रस्त्यावर उतरले. आदित्य देवकर (वय 29, रा. इंदिरापथ, कोपरगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
आदित्य हा रात्री साडेदहा वाजता दुचाकीवरून चालला होता. कोपरगावमधून (Kopargaon) जात असलेल्या मनमाड रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीवरील आदित्यला खड्ड्याचा अंदाज येत नव्हता. रस्त्यावर पथदिवे असून नसल्यासारखे आहेत. यातच त्याच्या दुचाकीला जड वाहनाने धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. कोपरगाव पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.
आदित्य याच्या अपघाताची माहिती कोपरगावात त्याच्या नातेवाईक आणि मित्र परिवारामध्ये वेगाने पसरली. वैद्यकीय उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. आज सकाळी कोपरगावमधील युवकांनी एकत्र येत, सत्ताधाऱ्यांनी रस्त्याचं काम करत नाहीत, अपघाताच्या (Accident) नावाखाली लोकांचे बळी घेत आहे, असा आरोप करत आक्रोश केला.
आदित्यला श्रद्धांजली वाहण्यात आली. 'भ्रष्ट कारभाराचा निरपराध बळी, अपघात नव्हे हा तर खूनच..,' असा श्रद्धांजली फलकावर मजकूर लिहिला होता. युवकांनी सत्ताधाऱ्यांच्या उदासीन कारभाराचा निषेध करताना, जोरदार घोषणाबाजी केली. 'भीक द्या भीक द्या, रस्त्यासाठी भीक द्या', 'भ्रष्ट कारभाराचा जाहीर निषेध', अशा जोरदार घोषणाबाजी केल्या.
दरम्यान, अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर गेल्या दोन महिन्यात झालेल्या अपघातात दहा जणांचा बळी गेला आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते अगदी संथगतीने सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यातून किरकोळ अपघाताचे महिन्याला प्रमाण शेकडोमध्ये आहे. अपघातानंतर कायमस्वरूपी जायबंदी होण्याचे प्रमाण मोठं आहे.
या रस्त्याच्या कामासाठी अनेकदा आंदोलन झाले. तरी काम मार्गी लागत आहे. सत्ताधारी आणि विरोधक या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात हतबळ ठरत आहे. केंद्रीय महामार्ग नितीन गडकरी यांनी हा रस्त्याचे काम का पूर्ण लागत नाही, असे म्हणत लाज वाटते, असे म्हटले होते. केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रोजेक्ट सादर करताना, महामार्ग करत आहेत. मात्र अहिल्यानगर-मनमाड रस्ता मार्गी लावता येत नसल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.
कोपरगावमधील रस्त्यासाठी सत्ताधारी आमदार आशुतोष काळे यांनी साडेतीन हजार कोटी रुपये रस्त्यासाठी आणल्याचा दावा केला होता. पण रस्त्यांची परिस्थिती पाहिल्यावर हे साडेतीन हजार कोटी गेले कुठे, असा प्रश्न पडतो. रस्ते आहे की, खड्डे आहेत, हेच कळत नाही. याबाबत स्थानिक विरोधकांनी देखील यावर सवाल उपस्थित केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.