Bacchu Kadu : माऊलीने पदर फाडून 'बच्चू'ला बांधले कर्जमाफीचे बंधन : निर्णय झाल्यावरच सोडायचं म्हणून तंबीही दिली!

Bacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये महाएल्गार आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही नागपूरचे असल्याने सरकारवर दबाव वाढत आहे.
Prahar Janshakti Party leader Bacchu Kadu leads MahaElgar protest in Nagpur demanding full loan waiver for farmers.
Prahar Janshakti Party leader Bacchu Kadu leads MahaElgar protest in Nagpur demanding full loan waiver for farmers.Sarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu : माझं बंधन कर्जमाफी झाल्यावरच सोडा! अशी विनवणी करत पवनार येथील महिला संगीता धाकतोड यांनी आपल्या साडीचा पदर फाडून माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हाताला बंधन बांधले आणि कर्जमाफीचे प्रतीकात्मक आश्वासन त्यांच्या हातात ठेवले. भावनांनी ओथंबलेला हा प्रसंग पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, तर जमलेल्या लोकांच्या घोषणांनी आकाश दणाणून गेले.

बच्चू कडू यांच्या ‘महाएल्गार यात्रे’चा ताफा मंगळवारी सायंकाळी नागपूरमध्ये धडकला. त्यापूर्वी वर्धा जिल्ह्यातील पवनार मार्गे हा ताफा जात असताना, शेतकरी व महिलांनी मोठ्या संख्येने महामार्गावर गर्दी केली होती. कडूंच्या वाहनाचा ताफा थांबताच संगीता धाकतोड यांनी ट्रॅक्टरवर चढत थेट बच्चू कडू यांच्यापर्यंत पोहोच घेतली.

आमच्या शेतकऱ्यांचं जीवन कर्जाच्या जंजाळात अडकलंय. आमची सुटका कर्जमाफीशिवाय होणार नाही, असं म्हणत त्या माऊलीने साडीचा पदर फाडून त्यांच्या हाताला बांधला. या भावनावेगाने भरलेल्या क्षणाला बच्चू कडूंनीही प्रतिसाद दिला. त्यांनी तत्काळ महिलेचं नाव व गाव विचारलं आणि म्हणाले, कर्जमाफी झाल्यावरच तुझ्याच हाताने हे बंधन सोडवेन. तोपर्यंत हे माझ्यावरचं शेतकऱ्यांचं वचन समजून ठेवतो. या संवादाने उपस्थित शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास आणि आशा निर्माण झाली.

Prahar Janshakti Party leader Bacchu Kadu leads MahaElgar protest in Nagpur demanding full loan waiver for farmers.
Bachchu Kadu Protest : बच्चू कडूंचा कोणत्या मागण्यांसाठी महाएल्गार?

हातात वाळलेलं पीक, डोळ्यांत अश्रू :

महाएल्गार यात्रेत सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी हातात वाळलेली सोयाबीन, कपाशीची झाडं, कोमेजलेली पिकं आणि पिवळी पडलेली केळी घेऊन मोर्चात सहभाग घेतला होता. “हेच आमचं जगणं आहे, ” असं म्हणत त्यांनी शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदवला. पवनारसह आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती या मोर्चात दिसून आली. शेतकऱ्यांच्या या व्यथा, राग आणि आशेचा संगम म्हणजेच या दिवसाचं चित्र होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com