नाशिक : मुंबईमध्ये सुनावणी घेण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होत नाही. यासंदर्भात जागा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे (Koregaon-Bhima inquiry commission) पदाधिकारी नाराज झाले. याबाबत आयोगाने संतप्त होऊन चौकशीचे काम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत सुनावणीसाठी सुयोग्य जागा मिळेपर्यंत भविष्यातील सर्व सुनावणी स्थगित ठेवण्याचा निर्णय निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने घेतला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचार घटनेमागचे सत्य शोधून काढण्यासाठी राज्य सरकारने हा आयोग नेमला होता. त्याचे कामकाज सुरु होते. हा चौकशी आयोग मुंबई, पुण्यात सुनावनीचे कामकाज करीत होता. त्याचे सुनावणीचे काम तेथे सुरु होते.
यासंदर्भात रमेश खोकराळे यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले, ‘‘करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे नियम पाळून सुनावणी घेण्यासाठी मुंबईत सुयोग्य जागा उपलब्ध करून दिलेली नाही, हे सरकारला कळवले होते’’
याबाबत २८ ऑक्टोबरला गृह विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत आणि पूर्वीही त्यासाठी चर्चा केली. राज्य शासनाने सह्याद्री गेस्ट हाऊस तसेच यशवंतराव चव्हाण सभागृह किंवा मंत्रालय अथवा सीएसटीजवळ सुयोग्य जागा देण्याची सूचना केली होती. तरीही सकारात्मक प्रतिसाद नाही’’ असे आयोगाने राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात केले नमूद केले आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.