नाशिक : येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या नविन इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP leader Pankja Munde) यांच्या उपस्थितीत झाला. हे दोघे कार्यक्रमाला आल्याने ते काय बोलतात, याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र ते जाहीर कमी, एकमेकांच्या कानाशीच अधिक बोलल्याने चर्चेला विषय देऊन गेले.
यावेळी प्रारंभी संयोजक आमदार देवयानी फरांदे यांनी पालकमंत्री भुजबळ यांचे स्वागत करण्यासाठी गुच्छ घेऊन पुढे गेल्या असता, भुजबळांनी त्यांनी आधी पंकजाचा सत्कार करा, असे सांगितले. तेव्हा आधी पंकजा मुंडे व नंतर भुजबळांचे स्वागत झाले. या धागा पकडून मुंडे म्हणाल्या, मी आधी ठरवल्याप्रमाणे दिड मिनीटे बोलणार होते. मात्र भुजबळ साहेब उपस्थित आहेत. ते माझ्या वडिलांचे मित्र आहेत. वय, अनुभव, काम आणि राजकारण या सर्वच दृष्टीने मोठे आहेत. आज त्यांनी माझा सन्मान केला. त्यामुळे मी दिड मिनीटे बोलणार होते, मात्र आता एक मिनीटच बोलणार आहे.
यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी, धूर ओकणाऱ्या कारखानदारीतून औद्योगिक विकासापेक्षा शिक्षण, वैद्यकिय आणि पर्यटन विकास या त्रिसूत्रीवर नाशिकचा विकासाची दिशा असावी. यंदाच्या दिवाळीत नाशिककरांनी हाच संकल्प करावा असे आवाहन केले.
ते म्हणाले, नाशिकचे हवामान ही जमेची बाजू आहे. इथल्या वातावरणाला पूरक अशा स्वरुपाची नाशिकच्या विकासाची दिशा असावी. वैद्यकिय उपचारासाठी उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी मुंबई पुण्याऐवजी नाशिकला यावे. शिक्षण व पर्यटनासाठी नाशिकला यावे धार्मिक, कला,साहित्य, क्रिडा क्षेत्रात नाशिकचा विकास झाला पाहिजे, व्हर्टीकल ऐवजी होरोझोन्टल दिशेने नाशिकची वाढ व्हावी असा दिवाळी निमित्ताने नाशिककरांनी नियोजनासाठी संकल्प करावा.
यावेळी माजी पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीष पालवे आदी उपस्थित होते.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.