Kranti Bhamre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Womens Politics: आमदार, खासदार नव्हे; महिला सरपंच करणार गरजूंना मानधनातून ‘ही’ मोठी मदत!

Kranti Bhamare; Commendable step taken by female sarpanch of small village in Satana-सोमपूर (सटाणा) येथील महिला सरपंचाने एक लहानसे पाऊल पुढे टाकले आहे.

Sampat Devgire

Women's News: सरपंच पदासाठी होणारे राजकारण ग्रामीण भागासाठी नवीन नाही. ही विधीमंडळ राजकारणाची पहिली पायरी देखील मानली जाते. अनेक जण सरपंच होण्यासाठी "बरेच काही" करण्याची तयारी ठेवतात. सरपंच झाल्यावर बरेच काही प्राप्तही करतात.

सोमपूर (सटाणा) या लहानशा गावाच्या महिला सरपंचाने मात्र एक वेगळा निर्णय घेतला. निर्णय तसा फार मोठा नाही. मात्र त्यागाच्या भावनेतून घेतलेल्या या निर्णयाने त्या गावाची चर्चा सुरू झाली आहे.

सोमपूरच्या सरपंच क्रांती भामरे यांनी आपल्याला मिळणारे सर्व मानधन गावाच्या भल्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. गावामध्ये अनेक गरीब आणि गावकसा बाहेरची मंडळी राहते. त्यांना अंत्यसंस्काराची सोय देखील नाही.

ही अडचण लक्षात घेऊन सरपंच भामरे यांनी आपले मानधन या गरीब घटकांच्या अंत्यसंस्कारासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमपूर हे तसे लहान गाव आहे. मात्र क्रांती भामरे यांनी घेतलेल्या या निर्णयाने अनेकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

गावगाड्यांच्या राजकारणात प्रसंगी आमदार, खासदारांनाही अवघड वाटावे, अशी स्पर्धा सरपंच पदासाठी असते. सरपंच पद महिलांसाठी राखीव असल्याने क्रांती भामरे यांना संधी मिळाली. या संधीचा त्यांनी समाज उपयोगी कामासाठी संधी म्हणून उपयोग केला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करण्याचा आपला प्रयत्न होता. त्यातूनच ही कल्पना पुढे आली. या निमित्ताने गावातील सर्व घटकांची संपर्क आणि संबंध जोडता यावा, असा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, माझी वसुंधरा अभियान, आयुक्त मॉडेल गाव, आर. आर. आबा सुंदर गाव अभियान, पंचायतराज असे विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. आमदार निधीतून येथे विविध विकासकामे झाली आहेत. स्वच्छतेबाबत जनजागृती आणि वृक्षारोपण यामध्ये ग्रामपंचायतचा पुढाकार आहे. प्लास्टिक बंदी आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध विकास कामे व सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या गावाची चर्चा आहे.

शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळावा आणि त्यात लोकसहभाग वाढावा म्हणून पुढाकार घेणार असल्याचे सरपंच भामरे यांनी सांगितले. श्रीमती भामरे या शेतकरी कुटुंबातील आहे त्यांची आर्थिक स्थिती फारशी सधन नाही. मात्र त्यांनी आपल्याला मिळणारे मानधन गावातील समाज उपयोगी कामासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने त्याची चर्चा झाली नसती तरच नवल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT