Kirit Somaiya Politics: मालेगावात सोमय्यांचा इव्हेंट; एकीकडे गो बॅक, दुसरीकडे पुष्पवर्षाव!

Bangladeshi issue; BJP welcomes Kirit Somaiya, Asif Sheikh says go back-भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्यात भाजप आणि विरोधक दोघांनीही केले आपले "कार्यक्रम
Kirit Somaiya
Kirit Somaiya Sarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya news: भाजप नेते किरीट सोमय्या शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर होते. यावेळी विरोधकांनी `गो बॅक` च्या घोषणा देत त्यांचा निषेध केला. भाजपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे हा दौरा चांगलाच चर्चेत राहिला.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कोणतीही कृती सहज नसते. त्यात काहीतरी राजकारण मुरलेले असतेच. त्याचा अनुभव मालेगावच्या त्यांच्या वारंवार होणाऱ्या दौऱ्यातून आला आहे. शुक्रवारचा त्यांचा दौरा त्या दृष्टीनेच सोमय्या यांच्यासाठी यशस्वी दौरा म्हणता येईल.

Kirit Somaiya
Radhakrishna Vikhe : मंत्री विखे 'या' मुद्यांवर अ‍ॅक्शन मोडवर; अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मालेगावच्या विविध नेत्यांवर `व्होट जिहाद`चा आरोप केला होता. मालेगाव मध्ये लोकसभेत झालेले मतदान हा भाजपच्या जिव्हारी लागलेला घाव होता. त्यानंतर ते सक्रिय झालेले दिसले. त्याचा प्रत्यय काल मालेगावला आला.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' शहरात 3977 बांगलादेशी, भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

सोमय्या यांच्या विरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटी कडून आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार असिफ शेख आणि मुस्तकीन डिग्निटी यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे धरले होते. "सोमय्या गो बॅक" अशा घोषणा देत त्यांनी काळे झेंडे दाखविले.

यावेळी आंदोलकअतिशय आक्रमक असल्याने पोलीस सतर्क होते. त्यावर कडी म्हणजे झेड प्लस सिक्युरिटी असलेले सोमय्या पोलीस ठाण्यात जाताना चालत गेले. त्यामुळे त्यांना हे निषेध आंदोलन अपेक्षित तर नव्हते ना, अशी चर्चा झाली.

श्री. सोमय्या हे खोटारडे आहेत. हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यांनी स्वतःच त्याची कबुली दिलेली आहे. दिल्ली विधानसभेचे निवडणूक सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी मालेगावचा मुद्दा चर्चेत ठेवण्याचा माजी खासदार सोमय्या यांचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

हे आंदोलक निघून गेल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देत सोमय्या यांचे स्वागत केले. यावेळी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. सोमय्या यांच्यावर फुलांचा वर्षाव केला जात होता. सुरेश निकम, विशाल सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी हा स्वागताचा कार्यक्रम केला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्या मोहिमेचे जोरदार स्वागत केले.

विरोधक आणि समर्थक दोघांनीही सोमय्या यांना अपेक्षित असेच उपक्रम केले. यानिमित्ताने श्री सोमय्या यांची शहरभर चर्चा झाली. बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत राहिला. हा मुद्दा चर्चेत राहणे भाजपच्या हिताचे आहे, हे लपून राहिलेले नाही. एकीकडे सरकारकडून "एसआयटी"ची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे सोमय्या स्वतःची वेगळी चौकशी करीत आहेत. त्यामुळे त्यांचा हा दौरा राजकीय मायलेज घेणारा यशस्वी इव्हेंट असाच म्हणता येईल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com