Nashik News, 04 Oct : कुंभमेळा विकास आराखडा आणि नियोजनाची बैठक आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा होण्याची शक्यता आहे. नाशिकला 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची राजकीय चर्चा जोरात आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील चारही मंत्र्यांना टाळले होते. विशेषता जिल्ह्यातील खासदार भास्करराव भगरे, राजाभाऊ वाजे आणि डॉ. शोभा बच्छाव यांना कुंभमेळ्यापासून सरकारने जाणीवपूर्वक लांब ठेवले आहे. याबाबत संबंधित खासदार आक्रमक आहेत.
या पार्श्वभूमीवर आज मुंबईत सह्याद्री अतिगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीला जिल्ह्यातील मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र बैठकीसाठी पुन्हा सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचाच विसर पडला.
यापूर्वी जिल्ह्यातील खासदारांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत विश्वासात घेतली जात नसल्याची तक्रार केली होती. त्या पाठोपाठ जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही सिंहस्थाच्या कामाविषयी माहिती घेतली. मंत्री भुजबळ यांनीही सरकारवर अप्रत्यक्षरीत्या नाराजी व्यक्त केली होती.
आज मुंबईत होणाऱ्या सह्याद्री अतिगृहावरील बैठकीत जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांना निमंत्रण नाही. विशेषता कुंभमेळा होत असलेल्या शहरातील सर्व तिन्ही आमदार भाजपचे आहेत. आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकले यांना पुन्हा एकदा सिंहस्थ साठी सरकार विसरले.
यापूर्वी महापालिकेत झालेल्या संस्थांच्या बैठकीत जिल्हा बाहेरील आमदार मंगेश चव्हाण उपस्थित राहिले होते. त्यावरून सत्ताधारी महायुती पक्षातच खदखद व्यक्त झाली. शहरातील तिन्ही भाजपच्या आमदारांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना गाठले होते.
आज होणाऱ्या बैठकीत महापालिकेला 400 कोटी रुपयांचे बॉड उभारण्यास मिळालेली परवानगी, महापालिकेचा 15 हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन याचा आढावा घेतला जाईल. त्यातील महत्त्वाच्या कामांना आजच मंजुरी मिळू शकते.
मात्र, यानिमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामे राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे. यंदाच्या सिंहस्थातील बहुतांशी कामांचे क्लब टेंडरिंग झाले आहे. यामध्ये नागपूर आणि गुजरातच्या कंत्राटदारांना महत्त्व दिले जाण्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीनंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.