Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

Ajit Pawar : 'पक्ष न पाहता...', मुस्लिम शिष्टमंडळाने भेट घेताच नगरमधील 'आय लव्ह मोहम्मद' रांगोळी प्रकरणी अजितदादांचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश

Ajit Pawar On Ahilyanagar communal tension : अहिल्यानगर शहरात 'आय लव्ह मोहम्मद' अशी मुस्लीम धर्मगुरुंच्या नावाची रांगोळी काढत विटंबना केल्यावरून दोन गटात मोठा तणावं निर्माण झाला होता. त्यानंतर विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले होते.
Published on

Ahilyanagar News, 04 Oct : अहिल्यानगर शहरात जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात त्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करा, असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिले आहेत.

पारनेर येथे अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. अहिल्यानगर शहरात 'आय लव्ह मोहम्मद' अशी मुस्लीम धर्मगुरुंच्या नावाची रांगोळी काढत विटंबना केल्यावरून दोन गटात मोठा तणावं निर्माण झाला होता.

त्यानंतर विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर आले होते. यावेळी आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केल्याने आणखी मोठा तणाव निर्माण झाला.

Ajit Pawar
Prakash Ambedkar : '...म्हणून मोहन भागवत शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनाला जात नाहीत?' ओबीसींचा उल्लेख करत प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरून शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत शहरात आणि जिल्ह्यात जाणीवपूर्वक जातीय तणाव निर्माण होतील अशा घटना वारंवार घडत असल्याकडं लक्ष वेधलं. तसंच गेल्या दहा महिन्यांपासून काही लोकप्रतिनिधी व जातीयवादी संघटनेचे लोक वारंवार तणाव निर्माण होणारी वक्तव्य करत आहेत.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी जाणूनबुजून अशी कृत्य सुरू असूनही पोलीस प्रशासन त्यांच्या विरोधात कारवाई करत नाहीत, असंही या शिष्टमंडळाने अजितदादांच्या कानावर घातलं. त्यानंतर अजित पवारांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंना बोलावून जातीय तणाव निर्माण करणाऱ्यांविरोधात त्याचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले शिवाय जातीय तणाव कमी करण्यासाठी मोहल्ला समिती स्थापण्याची सूचना देखील यावेळी केली.

Ajit Pawar
Shivsena UBT Politics : भाडोत्री, डरपोकांच्या फौजेत मोहन भागवत तुम्हीसुद्धा? ठाकरेंच्या शिवसेनेचा सरसंघचालकांवर प्रहार

शिष्टमंडळाची अजित पवारांना नेमकी मागणी काय?

मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने अजित पवारांना सांगितलं की, कोठला येथील रास्ता रोको आंदोलनाशी संबंध नसतानाही अनेकांना अटक केली असून त्यांची नावे वगळावीत. पोलीस गुन्ह्याशी संबंध नसलेल्यांना त्रास देणं थांबवावं. तसंच पोलिसांनी पहाटेची गस्त वाढवावी आणि प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावी, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com