Nashik Simhastha land expansion protest Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Controversy : कुंभमेळ्यात वादाचा धुराळा! गिरीश महाजनांच्या 'त्या' प्रस्तावावर उदासीन आखाडा आक्रमक

Kumbh Mela controversy over proposal by Girish Mahajan: कुंभमेळ्यात गिरीश महाजन यांच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला असून आखाड्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

Sampat Devgire

Mahant Durgadas News: सिंहस्थ कुंभमेळा तयारी सुरू होण्याआधीच साधू आणि प्रशासन यांच्यातील मतभेद पुढे आले आहेत. शाही स्नानाच्या परंपरेत बदल करण्यास साधूंनी नकार दिला आहे. या प्रश्नावर सरकारला थेट इशारा देण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय सुचविले होते. या उपायांना प्रशासनाने मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. साधूंचे आखाडे देखील त्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मधील प्रमुख आखाड्याने विरोधाचा झेंडा फडकवला आहे. बडा उदासीन आखाड्याचे महंत दुर्गादास यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. शाही स्नानाच्या परंपरेत कोणताही बदल मान्य नाही असे त्यांनी सांगितले. महंत दुर्गादास यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. आयुक्त शेखर सिंग यांना त्यांनी लिखित निवेदन दिले. निवेदनात विविध सूचना करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली.

यानिमित्ताने बडा उदासीन आखाड्याने सरकारच्या तयारीचा फोलपणा पुढे आणला आहे. साधूंच्या आखाडे आणि अन्य सुविधा यासाठी काय खर्च केला हे राजपत्रत जाहीर करावे, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या प्रत्येक बाबीचा राजपत्रात उल्लेख केला जातो. यंदा त्याकडे सरकारने कानाडोळा केला आहे. कुंभमेळ्यासाठी तीस हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र त्याची विगतवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याकडे महंत दुर्गादास यांनी लक्ष वेधले आहे.

गर्दी आणि त्यातून होणाऱ्या अडचणींना पर्याय म्हणून यापूर्वी मंत्री महाजन यांनी काही सूचना केल्या होत्या. काही स्नानासाठी संबंधित आखाडे निवडक साधूसह जातील. उर्वरित साधू आणि अनुयायी गावाबाहेर नव्याने बांधण्यात येणाऱ्या तलावात आंघोळ करतील, असे त्यांनी जाहीर केले होते.

मित्रांच्या या सूचनेने कुंभमेळ्यातील मुख्य घटक असलेला शाही स्नान आणि त्याची परंपरा याला बाधा येणार होती. काही स्नान हे शेकडो वर्षांच्या निश्चित केलेल्या परंपरा आणि क्रमानुसारच होते. यासाठी विशिष्ट वेळ राखीव असते. यामध्ये आजवर कोणताही बदल झालेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT