Ongoing road construction work for Kumbh Mela in Nashik’s Panchavati area amid controversy over alleged obstruction by corporators. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या कामात भाजप नगरसेवकांकडून टक्केवारीची मागणी; 5 जणांची चौकशी, आयुक्तांची मध्यस्ती अन् प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत...

Kumbh Mela Road Controversy : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यात अनेक कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये कोणीही अडथळा आणू नये, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या दौऱ्यात दिला होता.

Sampat Devgire

Nashik News, 10 Apr : कुंभमेळ्याच्या कामात सत्ताधारी नगरसेवकच अडथळा आणत आहेत. या संदर्भात कंत्राटदाराने तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात पंचवटी भागात ८ किलोमीटरचा रस्ता करण्यात येत आहे.

या कामात सत्ताधारी भाजपच्या पाच नगरसेवकांनी अडथळा आणला. कंत्राटदाराला धमकावले. दोन महिला नगरसेवकांचे पती आणि तीन नगरसेवकांनी या संदर्भात थेट टक्केवारी मागितल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे कंत्राटदार शिवहरे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सचिन मोरे यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र दिले. आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतल्यावर चक्रे फिरली.

यासंदर्भात थेट मुख्यमंत्री कार्यालयाला त्याची माहिती कळविण्यात आली. पोलीस आयुक्तांनाही पत्राची प्रत देण्यात आली. त्यामुळे काल दिवसभर महापालिकेत आणि स्थायी समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. पोलिसांच्या गुन्हे शाखेने भाजपच्या तीन नगरसेवक आणि दोन नगरसेविकांच्या पतींना चौकशीसाठी बोलावले.

या पाच जणांची अडीच तास चौकशी झाली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यात अनेक कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये कोणीही अडथळा आणू नये, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या दौऱ्यात दिला होता.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरच हे प्रकरण पुढे आले आहे. त्याचा संबंध सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची आहे. याबाबत टक्केवारीचा विषय असल्याची चर्चा सुरू झाली. पोलिसांनी या नगरसेवकांची नावे गोपनीय ठेवली आहेत. मात्र पोलिसांच्या चौकशीचे पडसाद उमटले आहेत. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा नगरसेवकांवर निकृष्ट काम करणाऱ्या कंत्रदारांकडून दबाव आणण्याचा प्रकार असल्याचा दावा, या नगरसेवकांनी केला आहे.

कुंभमेळ्याच्या कामात विरोधी पक्षांकडून विविध आक्षेप घेतली जात आहेत. राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन या संदर्भात लक्ष ठेवून आहेत. शिवसेना शिंदे पक्षाचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही या संदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवर आरोप झाल्याने तो चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT