Sexual Harassment : पोलिसांचे वेशांतर अन् 'द केरळ स्टोरी'चा भांडाफोड, 8 महिलांचे शोषण अन् धर्मांतरणांसाठी दबाव...

Nashik Police Conversion Allegations : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचे लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यांच्यावर धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा देखील आरोप आहे.
Police take action in Nashik IT company sexual harassment case where 7 accused have been arrested amid conversion allegations.
Police take action in Nashik IT company sexual harassment case where 7 accused have been arrested amid conversion allegations.sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिलांचे लैंगिक शोषण, छळ झाला. याप्रकरणी 9 महिलांनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या एचआर प्रमुखासह सात जणांना अटक केली आहे.

बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत विकृत कर्मचाऱ्यांनी हे प्रकार घडवले. त्यामागे धर्मांतराचा डाव असल्याचा आरोप होतो आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात सहा ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी अतिशय वेगाने हालचाली करीत संशयीतांना अटक केले. मात्र या गुन्हेगारांवर गेले दोन आठवडे महिला पोलिस अधिकारी पाळत ठेवून होत्या. महिला पोलिस अधिकारी वेशांतर करून कंपनीत दाखल झाल्या. त्यांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

यासंदर्भात काही महिला धाडस करून पुढे आल्यावर त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने कार्यवाही केली. या प्रकरणाची जबाबदारी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यावर सोपवण्यात आली.

पीडितांशी अश्लील हावभाव, आरोपी महिलांशी करत असलेले गैरवर्तन वेशांतर केलेल्या महिला पोलिसांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. 40 हून अधिक सीसीटीव्ही पाहत आरोपींच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा केले.

उपयुक्त राऊत यांनी अन्य दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची टीम केली. यातील महिला पोलिसांनी वेशांतर करून कंपनीत वावर सुरू केला. यातून विविध पुरावे गोळा करून गुन्हा दाखल केला.

नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत घडलेला हा प्रकार काहीसा "केरळ फाइल्स"स्वरूपाचा असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटना करीत आहेत. या प्रकाराला पोलिसांनी "दृश्यम ३"प्रमाणे थेट आरोपीच्या घरातच पोलिसांनी घसून तपास केला. त्यामुळे हा प्रकार विशेष चर्चेचा विषय आहे.

Police take action in Nashik IT company sexual harassment case where 7 accused have been arrested amid conversion allegations.
Devendra Fadnavis : नाशिकमध्ये आयटी कंपनीच्या आडून धर्मांतराचे रॅकेट ; CM फडणवीसांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले..

या संदर्भात सहा जणांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. कंपनीतील प्रोसेस लीडर तौसीफ अत्तार, शफी भिकन शेख, आसिफ आफताब, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, दानिश शेख यांना अटक करण्यात आली आहे. कंपनीच्या पुणे येथील एच आर प्रमुख महिला अधिकाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोंदू कॅप्टन खरात आणि वादग्रस्त पत्रकार रवींद्र एरंडे यांच्या महिलांच्या अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकला झालेली बहुराष्ट्रीय कंपनीतील महिलांवरील अत्याचार चर्चेचा विषय ठरला आहे.

Police take action in Nashik IT company sexual harassment case where 7 accused have been arrested amid conversion allegations.
Gopichand Padalkar : अशोक खरात, रवींद्र एरंडे प्रकरणात शांत राहिलेल्या पडळकरांची 'तिसऱ्या' प्रकरणात एन्ट्री, CM' ची घेणार भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com