District Collector Jalaj Sharma met the Sadhus and Mahants Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा नियोजनावरुन नेत्यांमध्ये वाद, तिकडे साधु-महंतही नाराज ; जिल्हाधिकाऱ्यांनाच घ्यावी लागली दखल

Kumbh Mela Planning Nashik: महायुतीच्या नेत्यांमध्ये आधीच कुंभमेळा नियोजनावरुन वाद आहे. त्यात आता नियोजनात सहभागी करुन घेतलं जात नाही अशी खंत साधु-महंतानी व्यक्त केल्याने जिल्हाधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी करुन घेतलं जात नाही म्हणून जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांमध्ये आधीच वाद आहे. मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री असून ते जाणीवपूर्वक इतर मंत्री व स्थानिक आमदारांना कुंभ नियोजनापासून दूर ठेवत असल्याचा आरोप आहे. अशातच आता तिकडे साधु-महंतांकडूनही नियोजनात सहभागी न केल्याची खंत व्यक्त होत होती.

मात्र, साधु-महंतांची नाराजी परवडणारी नसल्याने स्वत:जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे. साधु-महंताची नाराजीला दूर करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (ता. २८) पंचवटीतील भक्तिधाम येथे साधु-महंतांची भेट घेऊन संवाद साधला. कुंभमेळ्यासाठी होणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण केली जातील. साधू- महंतांच्या अडी- अडचणी सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले की, कुंभमेळ्यानिमित्त शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. दीर्घकालावधी लागणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी दक्षता घेण्यात येईल. जिल्हा प्रशासन साधू- महंतांशी नियमितपणे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेईल. तसेच त्यांच्या सुचनांची दखल घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.

साधूग्रामसाठी आवश्यक भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. तसेच लवकरच त्र्यंबकेश्वर येथील साधू- महंतांशी संवाद साधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी साधू-महंत यांनीही काही मौलिक सूचना केल्या. त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला हे साधू महंत होते उपस्थित

अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री जितेंद्रानंद सरस्वती, आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते भक्तिचरणदास महाराज, कैलास मठाचे महंत स्वामी संविदानंद सरस्वती, दिगंबर आखाड्याचे महंत रामकिशोरदास शास्त्री, तपोवनातील बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे रामशरणदास महाराज, महंत माधवदास राठी व तुषार भोसले आदी संत-महंत उपस्थित होते.

महायुतीच्या नेत्यांमध्ये स्पर्धा

दरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये कुंभमेळ्याच्या नियोजनावरुन वाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच कुंभमेळा आढावा बैठक घेतली. त्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कुंभमेळावा आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे कुंभ आखाड्यात उतरण्यासाठी सगळेच आतूर झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT