Devendra Fadnavis : कोणाचही आरक्षण काढून देणार नाही, मराठा आणि ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

Maratha OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच केली आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis, Manoj Jarange
Devendra Fadnavis, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसीतून आरक्षण हवे अशी मराठा समाजाची मागणी आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव एकवटले असून मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यासंदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

फडणवीस म्हणाले की, मराठा व ओबीसी दोन्ही समाजाच्या हिताचा विचार शासन करेल. कुणावर अन्याय करुन कुणाला काहीही देणार नाही. मराठा, ओबीसी दोन्ही समाजावर अन्याय होऊ देणार नाही. दोन्ही समाजाचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. ओबीसींनी ध्यानात घ्यावं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवणार आहोत. मी व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाचे प्रश्न सुटले आहेत हे त्यांनीही लक्षात घ्यावं असं फडणवीस म्हणाले.

कोणाचंही आरक्षण काढून घेणार नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. ते कोर्टातही टिकलं आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनीही अभ्यास करुन मागणी करावी. लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये. आंदोलनासाठी जे नियम निकष केले आहेत, त्या नियमानुसार हे आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही असही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis, Manoj Jarange
Manoj Jarange Patil Agitation: एकनाथ शिंदेंचे मंत्री म्हणाले, जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त!

फडणवीस पुढे म्हणाले, ओबीसीमध्ये जवळपास साडेतीनशे जाती आहेत. आपण समजा मेडिकलच्या प्रवेशाबाबत विचार केला तर ओबीसीचा कटऑफ हा एसीबीसीच्यावर आहे. एसीईबीसीचा कट ऑफ हा इडब्ल्यूएसच्यावर आहे. त्यामुळे या मागणीमुळे नेमकं किती भलं होणार आहे, याची मला कल्पना नाही. आपण नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाचे हिताचे काय आहे हे आपल्या लक्षात येईल असं फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis, Manoj Jarange
Maratha Reservation Protest: जरांगेंना मुंबईच्या बाहेरच रोखण्यासाठी फडणवीसांनी लावली पूर्ण ताकद; शिर्डीत दोन दिग्गज नेत्यांमध्ये 'प्लॅन' ठरला?

दरम्यान, पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाने स्वतःच्या हितासाठी अभ्यासपूर्वक मागण्या मांडल्या पाहिजेत. एसीईबीसी  किंवा इडब्लूएस असेल आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण मिळणार नाही. जर उद्दिष्ट फक्त राजकीय आरक्षण असेल, तर तो वेगळा मुद्दा आहे. परंतु जर खरा हेतू सामाजिक आणि आर्थिक बदल साधण्याचा असेल, रोजगाराच्या संधी मिळाव्यात, शिक्षणात प्रवेश मिळावा हा असेल, तर या मागणीवर किमान काही विचारवंतांनी तरी गांभीर्याने विचार करायला हवा, असे फडणवीस म्हणाले.

आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे पाहायला बघायला मिळत आहे. हे आंदोलन आमच्यासाठी राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू. पण, काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यातून त्यांचा फायदा न होता नुकसानच होईल असा इशाराही फडणवीस यांनी विरोधकांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com