Devendra Fadanvis & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics: देवेंद्र फडणवीस नाशिकच्या कुंभमेळ्याला करणार प्रयागराजपेक्षाही मोठा उत्सव?

Kumbh Mela review meeting, CM Devendra Fadnavis' instructions for pollution free Godavari, Kumbh Mela publicity boost-सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच गोदावरी प्रवाही आणि स्वच्छ करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भर

Sampat Devgire

Kumbh Mela News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत कुंभमेळा आढावा बैठक घेतली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या नियोजनातील कामांची दिशा ठरली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा महाविकास आघाडी सरकारसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे. हिंदू भाविकांचा आणि साधूंचा उत्सव म्हणून त्याकडे पाहिले जातर आहे. त्या दृष्टीने नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा प्रयागराज येथील कुंभमेळ्यापेक्षाही अधिक यशस्वी उत्सव करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी डीजिटल प्रसिद्धीवर विशेष भर राहील, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत ही बैठक झाली. बैठकीत कुंभमेळा आधीच रस्ते आणि महत्त्वाच्या कामांना सुरुवात करावी. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता राहू नये यासाठी समन्वय करण्याचे ठरले.

प्रत्येक सिंहस्थ कुंभमेळ्यात गोदावरी प्रदूषणाबाबत विविध आक्षेप असलेल्या याचिका न्यायालयात दाखल होतात. त्यावरील प्रदूषण टाळण्यासाठी हरित लवादाकडे याचिका होत्या. यासंदर्भात पर्यावरणाशी संबंधित स्वयंसेवी संस्थांनी यंदाही आक्षेप नोंदवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने त्यांना आळा बसू शकेल.

गोदावरी प्रदूषणाचा अनुभव गाठीशी धरून राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या बैठकीत गोदावरी प्रदूषण निर्मूलनावर भर दिला. त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिसाद दिला आहे. कुंभमेळ्याआधी गोदावरी स्वच्छ आणि प्रवाही करण्याची ताकीद महापालिकेला देण्यात आली.

या बैठकीला पहिल्यांदाच जिल्ह्यातील मंत्री उपस्थित होते. यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे, पणन मंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव रमेशकुमार उपस्थित होते. या बैठकीत विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विकासकामांचा आराकडा सादर केला.

अलाहाबादच्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा कुंभमेळा होत आहे. त्या दृष्टीने त्याला देशभर प्रसिद्धी देण्याचा प्रयास होईल. त्यासाठी डिजिटल प्रणालीद्वारे प्रचार करण्यात यावा. त्यासाठी प्रचार आणि प्रसिद्धीचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT