Kailas Khandbahake & Rajabhau vaje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kumbhmela Politics: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरही कैलास खांडबहाले उपोषणावर ठाम, म्हणाले, तो पर्यंत माघार नाही...

Kumbh Mela Trimbakeshwar road widening, farmers devastated by NMRDA,Kailash Khandbahale insists on hunger strike-`एनएमआरडीए`ने त्र्यंबकेश्वर रस्त्यासाठी शंभर मिटारचा नियम करून शेतकऱ्यांविरोधात षडयंत्र केल्याचा आरोप

Sampat Devgire

Nashik Politics News: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या घरे आणि इमारतींवर कारवाई होत आहे. या विरोधात शेतकरी एकवटले. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची येथे रीघ लागली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही नेते पाठींबा जाहीर करीत आहेत.

एनएमआरडीए कडून त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या दुतर्फा शंभर मीटर हद्दीत बांधकामे पाडली जात आहेत. शेतकऱ्यांची घरे आणि दुकाने उध्वस्त झाली आहेत. त्या विरोधात शेतकरी एकवटला असून आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी एनएमआरडीए कडून सुरू असलेले दबावतंत्र थांबवावे. शेतकऱ्यांची घरे वाचवावीत अशी मागणी करण्यात आली होती.मुख्यमंत्र्यांनी त्याला सहमती दर्शवत प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांना दिल्या होत्या. मात्र अद्यापही शेतकरी दास्तावलेले आणि साशंक आहेत

या संदर्भात गेल्या चार दिवसांपासून कैलास खांडबहाले यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. राजकीय पदाधिकारी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीवरून हे उपोषण आता साखळी उपोषण करण्यात आले आहे. मात्र कोणते परिस्थिती माघार घेणार नसल्याचे कैलास खांडबहाले यांनी सांगितले.

एनएमआरडीए ने महापालिका हद्दीत रस्त्याचा नियम साडेबावीस मीटर असा केला आहे. मात्र त्रंबकेश्वर ग्रामीण भागात हा नियम १०० मीटर केला आहे. त्यात १५ किलोमीटरच्या हद्दीत शेकडो शेतकरी बेघर होणार आहेत. असे अन्यायकारक धोरण करणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी मोठा संशय आहे.

महापालिका हद्दीत आणि त्र्यंबकेश्वर शहरात जो नियम आहे, तोच नियम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लागू केला जावा. या मागणीपासून कोणतीही माघार घेतली जाणार नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या व दुःख समजून घ्यावे. हे होत नाही तोपर्यंत उपोषणातून कदापी माघार घेतली जाणार नाही.

आज खासदार राजाभाऊ वाजे यांनी कैलास खांडबहाले यांची भेट घेतली. माजी खासदार हेमंत गोडसे, माजी नगरसेवक विलास शिंदे आदिंसह विविध पक्षांच्या नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे. माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी या आंदोलनाला सुसूत्रता आणली. आमदार हिरामण खोसकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आज आंदोलन स्थळी बैठक घेऊन शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांचा दबाव, वाजवी कारवाई आणि दमनकारी तंत्र यामुळे शेतकरी अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत कोणावरही विश्वास ठेवण्यास तयार नाही, असे उपोषणकर्ते खांडबहाले यांनी ठामपणे सांगितले.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT