Nashik Crime & Politics: नाशिकची नवी गुन्हेगारी; ‘ॲट्रॉसिटी’च्या धमकीने जमिनी हडपण्याचे सत्र... प्रकाश लोंढे याचे प्रताप!

Extortion case against Prakash Londhe, police action puts Londhe family in trouble, plot was hatched to grab land-‘आरपीआय’ नेता, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याच्या दोन्ही मुलांवर सातपूरला खंडणीचा नवा गुन्हा दाखल
Sandip-Karnik-Prakash-Londhe
Sandip-Karnik-Prakash-LondheSarkarnama
Published on
Updated on

Prakash Londhe News: ‘आरपीआय’ नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याची धक्कादायक प्रकरणी बाहेर येत आहे. त्याच्यासह दोन्ही मुलांविरुद्ध नव्याने खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाली.

‘आरपीआय’ नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याची दोन्ही मुले भूषण आणि दीपक यांच्याविरोधात खंडणीचा नवा गुन्हा दाखल झाला. सातपूर पोलिसांनी ही कारवाई केली. यानिमित्ताने लोंढे यांच्या गुन्हेगारीचे काही धक्कादायक प्रकार पुढे आले आहे.

खंडणीसाठी गोळीबार आणि हॉटेल मालकावर हल्ला प्रकरणी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे अटकेत आहेत. भूषण लोंढे हा सराईत गुन्हेगार फरार आहे. आता या तिघांविरोधात खंडणीसाठी जमीन हडप करण्याचा नवा गुन्हा पोलिसांत दाखल झाला आहे.

Sandip-Karnik-Prakash-Londhe
Trimbakeshwar Railway Project : नवे संकट! एनएमआरडीए पाठोपाठ रेल्वेसाठी सर्वेक्षण, त्र्यंबकेश्वरचे शेतकरी हवालदिल

यासंदर्भात शाहू म्हस्के यांनी तक्रार केली आहे. सातपूर येथील २३ गुंठे जमीन लोंढे आणि त्याच्या दोन्ही मुलांनी बळकावली होती. त्यासाठी त्यांनी म्हस्के यांच्या नातेवाईकांना हाताशी धरले. त्यानंतर ही जमीन कोणालाही विक्री करू नये, असे धमकावत खंडणीची मागणी केली.

Sandip-Karnik-Prakash-Londhe
Sujay Vikhe hint speech : पुन्हा मतदानाचे फतवे निघाले तर..; खासदारकीच्या पराभवानंतर सुजय विखेंचा पहिल्यादांच सूचक इशारा

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गेल्या एक महिन्यापासून राजकीय गुन्हेगारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. यामध्ये भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे आणि ‘आरपीआय’च्या माजी नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईने आपले धाडस वाढले. त्यामुळेच पोलिसात तक्रार केल्याचे श्री म्हस्के यांनी सांगितले.

दरम्यान या निमित्ताने माजी नगरसेवक लोंढे याचे नवे कारणामे समोर आले आहे. मागासवर्गीय समाजातील जमिनींचे वाद सोडविण्याचा दावा लोंढे करीत असत. त्यानंतर त्या बळकावल्या जात. जमीन मालकांना ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असे. या जमिनी कोणालाही विक्री करू नये, असे धमकावले जात होते.

ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन शहरातील अनेक जमीनी हडप करण्याचा लोंढे आणि त्याच्या कुटुंबीयांनी सपाटा लावला होता. यामध्ये विविध ठिकाणी जमिनी बळकावल्याचे उघड झाले आहे. याबाबत तपास सुरू असल्याने लोंढे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

नाशिक शहर पोलिसांनी याबाबत मोठी कारवाई सुरू केली आहे. दिवाळीच्या उत्सवातही त्यात खंड पडला नाही. शहर पोलिसांनी लोंढे प्रकरणात गांभीर्याने लक्ष घातले आहे. त्यामुळे जमिनी हडप करण्यासह खंडणी आणि अन्य अनेक गुन्हे पुढे येण्याची शक्यता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com