Kunal Patil, Ravindra Chavan & Shubhangi Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil News: शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेसला धुळ्यात भाजप एकाच वेळी धक्का देण्याच्या तयारीत?

Kunal Patil Politics; Congress leader Kunal Patil, Shiv Sena's Shubhangi Patil are on the path to BJP-माजी आमदार कुणाल पाटील, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांचा मात्र भाजपच्या दाव्याबाबत इन्कार

Sampat Devgire

Kunal Patil News: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी धुळ्यात काही प्रमुख नेत्यांना गळाला लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे धुळ्यात एकाच वेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाला भाजप धक्का देणार का याची चर्चा आहे.

भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समवेत काँग्रेस नेते माजी आमदार कुणाल पाटील यांची बैठक झाल्याची चर्चा आहे. या चर्चेनंतर येत्या शनिवारी (ता. 28) माजी आमदार कुणाल पाटील यांचं विविध नेते भाजप प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा समाज माध्यमांवर सुरू झाली आहे.

दुसरे नाव शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचे घेतले जात आहे. शुभांगी पाटील यांनाही भाजपने प्रवेश करण्यासाठी गळ घातली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांसाठी भाजप आपली ताकद लावत आहे.

माजी आमदार कुणाल पाटील यांच्याबरोबरच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेते शुभांगी पाटील यांच्याही भाजप प्रवेशाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही पदाधिकारी ही यावेळी भाजप प्रवेश करतील या चर्चेने धुळ्यात खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ते माजी आमदार कुणाल पाटील यांनी मात्र भाजप प्रवेशाचा इन्कार केला आहे. आपली भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या समवेत बैठक झाली. मात्र त्या बैठकीचा विषय खाजगी होता. त्यात राजकीय चर्चा झालेली नाही. माझा भाजप प्रवेश त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनीही समाज माध्यमांवर सुरू असलेल्या चर्चेचा इन्कार केला आहे. मला भाजप प्रवेश करायचा असता तर यापूर्वी निवडणुकीच्या वेळीच केला असता. अनेकांनी माझ्याशी संपर्क केला आहे, हे खरे आहे. मात्र मी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सोडणार ही केवळ राजकीय अफवा असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

एकंदरच राज्यभर विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपकडून प्रवेशासाठी येनकेन प्रकारे डाव अखले जात आहेत. त्यात भाजप काही प्रमाणात यशस्वी देखील झाला. धुळे जिल्ह्यात उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील ही दोन मोठी नावे पुन्हा चर्चेत आली आहेत. विशेषतः माजी आमदार कुणाल पाटील हे काँग्रेसचे बडे प्रस्थ असून त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. सहकारी संस्थांवरही त्यांचे वर्चस्व असल्याने त्यांच्या भाजपची चर्चा काँग्रेसला अस्वस्थ करणारी आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT