Devendra fadnavis Politics: देवेंद्र फडणवीस यांच्या त्या घोषणेने राज्यातील सक्षम जिल्हा बँकाही संकटाच्या फेऱ्यात?

Devendra fadnavis; CM Fadnavis' announcement of loan waiver will be a blow to cooperative banks, recovery will be halted-जिल्हा बँकांची कर्ज वसुली ठप्प होण्याची शक्यता वाढल्याने अनेक सहकारी बँकांपुढे गंभीर समस्या उभ्या राहू शकतात.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Co-operative Banks News: गेल्या आठवड्यात प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा केली. ही घोषणा राजकीय की वास्तव यावरून चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत लाडके शेतकरी म्हणून अनेक घोषणांचा पाऊस पाडला होता. मध्ये विज बिल माफी सह कर्जमुक्ती अशीही घोषणा असल्याचा विरोधी पक्षांचा दावा होता. पण नंतर मात्र अजित पवार यांनी घुमजाव करत कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

आता या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफी केली जाईल. राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी अनुकूल आहे. मात्र कर्जमाफी करण्यासाठी एक प्रक्रिया करावी लागते. निर्णय घेतला आणि लगेचच त्याची कार्यवाही अशी स्थिती नसते, असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadanvis
Rahul Gandhi Politics: काँग्रेस आक्रमक, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या न्यायालयीन चौकशीची मागणी!

एकीकडे विरोधी पक्षांकडून कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडे राज्य शासन याबाबत अनिश्चितता निर्माण होईल, अशी भूमिका घेत आहे. याचा थेट फटका सहकारातील आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांवर होणार आहे.

नाशिक जिल्हा बँक थकबाकीमुळे संकटात आली आहे. या बँकेच्या रिझर्व बँकेच्या परवान्याबाबत अनिश्चितता आहे. त्यासाठी आता बँकेने वसुलीला गती यावी यासाठी व्याजमाफीची घोषणा केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर अडचणीत असलेली जिल्हा बँक आता संकटात सापडणार आहे.

राज्यात कर्जमाफी होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच येत आहेत. त्यातून सहकार क्षेत्राला एक संदेश गेला आहे. कर्ज घेतलेले शेतकरी आणि थकबाकीदार दोघेही कर्जमाफी होणार या अपेक्षेने परतफेड करणे थांबविणार आहे. त्याचा मोठा फटका जिल्हा बँकांना बसेल अशी स्थिती आहे.

कर्जमाफी वरून सुरू झालेले राजकारण आता राज्यातील सर्वच जिल्हा बँकांना अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. मंत्री यांनी जाणीवपूर्वक आणि निश्चित कालावधी नसलेली घोषणा करून सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात कर्जमाफी होणार की सहकारी बँकांना राजकीय दृष्ट्या टार्गेट करून ही घोषणा झाली याची चर्चा सुरू आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com