Kunal Patil
Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Kunal Patil Politics : कुणाल पाटलांचा भाजपला दुसरा धक्का; धुळ्यात पॅनेलसाठी उमेदवारही मिळेनात!

Sampat Devgire

Dhule, 28 June : धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्कादायक पराभव पचवावा लागला. काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर दुसरा मोठा धक्का दिला आहे. धुळे खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेलसाठी उमेदवारही मिळालेले नाहीत.

धुळे सहकारी खरेदी-विक्री (Dhule Kharedi &Vikri Sangh) आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. धुळे ग्रामीण मतदार संघाचे काँग्रेसचे (Congress) आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने जोरदार सुरुवात केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच त्यांच्या गटाचे दोन उमेदवार बिनविरोध झाली आहे. पोपट सहादू शिंदे आणि अरविंद भालचंद्र शिरसाठ अशी बिनविरोध झालेल्या दोघांची नावे आहेत.

या गटात भाजपला उमेदवार देखील मिळू शकले नाही, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच निराशा पसरली आहे. धुळे शहराच्या सहकारी संस्थांतील राजकारणात भाजपला दुसरा मोठा धक्का सहन करावा लागला आहे.

या संस्थेच्या निवडणुकीचे मतदान येत्या सात जुलै रोजी आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आमदार पाटील यांनी लावलेल्या जबरदस्त फिल्डिंगमुळे भाजपच्या नेत्यांना परिपूर्ण पॅनेल देखील निर्माण करता आलेलं नाही.

पहिल्याच दिवशी आमदार पाटील यांचे दोन संचालक बिनविरोध झाले आहेत, त्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला होता. जिल्ह्यातील विविध संस्थांवर भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर या पक्षाला ओहोटी लागल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकांवर देखील दिसून आला आहे.

आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचे उर्वरित पंधरा जागांसाठी संभाजी गवळी, इंद्रसिंग गिरासे, रोहिदास विठ्ठल पाटील, विलास चौधरी, रमेश नांद्रे, कैलास पाटील, भटू पाटील, चुडामन मराठे, बापू खैरनार, दिनकर पाटील, सुनील पाटील, लहू पाटील, सुशीला चौधरी, अनिता पाटील आणि पंढरीनाथ बुधा पाटील हे उमेदवार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT