Election Budget : अजितदादांची इलेक्शन एक्स्प्रेस सुसाट; निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरणाऱ्या दहा मोठ्या घोषणा....

Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी लोकप्रिय घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 28 June : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी लोकप्रिय घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेऊन बाजी पलटवणाऱ्या काही घोषणा अजित पवार यांनी केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दहाव्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर त्यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प (Additional Budget) सादर केला आहे. या अतिरिक्त अर्थसंकल्पात अजितदादांनी (Ajit Pawar) अनेक लोकप्रिया घोषणा केल्या आहेत. यातील काही घोषणा तर निवडणुकीचे चित्र पालटवणारे ठरणार आहे.

या पंचवार्षिक योजनेतील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला बसलेला फटका लक्षात घेऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यातील तरतुदी पाहता तो निवडणूक जिंकण्यासाठी केलेल्या घोषणा वाटत आहेत. यातील काही घोषणांची प्रत्यक्ष अमंलबजावणी होते, हे पाहावे लागणार आहे.

अजित पवार यांनी मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातील गेम चेंजर ठरणाऱ्या घोषणा

  • वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळा’ची घोषणा

  • वारीतील मुख्य पालख्यांमधील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’तून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार

  • महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना जाहीर

  • मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेतून राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार

Ajit Pawar
Maharashtra Budget 2024 : अजितदादांचे शेतकऱ्यांसाठी 'मोठं गिफ्ट'; पूर्णपणे वीजमाफ
  • कृषिपंपाचे सर्व वीजबिल माफ करण्याची घोषणा

  • ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा

  • ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’तून राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपये विद्यावेतन देणार

  • राज्यभरातील पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतूद (बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्र)

  • कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य

Ajit Pawar
Maharashtra Additional Budget : ‘जयंत पाटीलसाहेब, सिंचनाच्या 108 प्रकल्पांना सुप्रमा दिली, आपल्यावेळी ते पुढंही जायचं नाही’ : अजितदादांचा चिमटा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com