वडांगळी : (Nashik) राजकारणात राजकीय महत्त्वाकांक्षा असते. याबरोबर जिद्द चिकाटी असली की लोक सहानुभूती निर्माण होऊन राजकारणात यशस्वी होता येते. असेच घडले आहे ते किर्तांगळी- एकलहरे (Sinner) ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. किर्तांगळी येथील यशस्वी महिला (Women) शेतकरी, (Farmers) टोमॅटो, द्राक्ष उत्पादक असलेल्या ६२ वर्षीय कुसुम शांताराम चव्हाणके (Kusum Chavhanke) या शेतात राबत असताना थेट गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहे. (while working in a own farm she became elected Sarpanch)
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मुकूंदा चव्हाणके हे थेट सरपंच पदाच्या तिरंगी लढतीत पराभूत झाले होते. पण यंदाच्या निवडणुकीत कुसुम नानी यांनी थेट सरपंचपदी विराजमान होत मागील निवडणुकीतील पराभवाचे शल्य पुसून काढले आहे. समर्थ परिवर्तन पॅनल आणि संत हरिबाबा पॅनलच्या यांच्या सरळ लढत होती. यावेळी मतदारांनी हरीबाबा यांच्या पॅनलला नकार देत परिवर्तनला पसंती दिली. पहिले थेट सरपंच झालेले दगू चव्हाणके यांनी केलेले जलयुक्त शिवार कामे गावांचा सर्वाच्च कामांचा पायंडा सिन्नरच्या पूर्वेकडील गावांमध्ये आठवणीत राहील.
कुसुम चव्हाणके यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले आहे. पती शांताराम, थोरला मुलगा काशिनाथ, मुकूंदा शेती व्यवसाय सांभाळतात. तर नितीन पुण्याला अभियंता आहे. धाकटा मुलगा मुकूंदा राजकीय चळवळीत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाचा सक्रीय कार्यकर्ते आहे.
सिन्नरच्या पूर्वेकडील गावांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष लागवड बरोबर टोमॅटो उत्पादक व्यवसायात चव्हाणके परिवाराने नाव कमविले आहे. दांडगा जनसंपर्क असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी कुसुम चव्हाणके (कुसुम नानी) यांना सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. निवडणुकीत प्रचारात मुकूंदाची आई कुसुम नानी व आमदार कोकाटे एकनिष्ठता सह स्थानिक पातळीवर विकासाचा मुद्दा घेऊन प्रचाराचे तंत्र वापरण्यात आले.
किर्तांगळी विकास कार्यकारी संस्थेत काही दिवसांपूर्वी सत्ता परिवर्तन घडवून आले होते. या सहकारी संस्था निवडणूक निकालांचा समर्थ परिवर्तन पॅनल व कार्यकर्त्यांनी फायदा घेत मतदारांपर्यंत सत्ता परिवर्तनाचा नारा पोहचविला. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनी विजय संपादित करत सरपंचपदाचा गवसणी घातली.
लोकांच्या पाठबळामुळे समर्थ परिवर्तन पॅनल सह कुटुंबाला निवडणुकीत यश मिळविले आहे. गावचा विकास करताना रस्ते सुधारणा व शेती व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी अधिक भर दिला जाईल.
- कुसुम चव्हाणके, नवनिर्वाचित सरपंच
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.